पुणे : निरा देवघर धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे विद्युतगृहाद्वारे नदीपात्रामध्ये सुरू असणाऱ्या ७५० क्युसेक विसर्गात वाढ करुन सकाळी सात वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून नदी पात्रामध्ये ५९० क्यूसेक व विद्युतगृहाद्वारे ७५० क्यूसेक असा एकूण १३४० क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. तसेच पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये कमी अधिक बदल होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. आणि नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ त्यांना सुरक्षितस्ठळी हलवावे असे आवाहन निरा पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता यो. स. भंडलकर यांनी केले आहे.
निरा देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन (VIDEO)
Reviewed by ANN news network
on
८/२१/२०२३ ११:१५:०० AM
Rating:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: