पिंपरी : शहरातील निगडी परिसरात असलेल्या एका प्रसिद्ध हॉटेलमधील प्रसाधनगृहात मोबाईल ठेवून ग्राहकांचे चित्रीकरण करणा-या एका वेटरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
परिसरातील हे प्रसिद्ध हॉटेल असून त्यातील महिला व पुरुषांसाठी असलेल्या प्रसाधनगृहात त्या हॉटेलमध्ये काम करणा-या एका वेटरने मोबाईल ठेवून तेथे जाणा-या ग्राहकांचे चित्रीकरण चालविले होते. एक ग्राहक प्रसाधनगृहात गेल्यानंतर त्याच्या लक्षात ही बाब आली. त्याने याबाबत हॉटेल व्यवस्थापनाला जाब विचारला. व्यवस्थापनाने चौकशी केली असता तो मोबाईल एका वेटरचा असल्याचे निष्पन्न झाले.
ग्राहकाने या प्रकरणी पोलिस कारवाईची मागणी केली. मात्र, व्यवस्थापनाने हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्राहक कारवाईच्या मुद्द्यावर ठाम राहिल्याने अखेरीस पोलिसांनी वेटरला ताब्यात घेतले असल्याचे समजते.
Reviewed by ANN news network
on
८/२१/२०२३ १२:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: