पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी विशाल जाधव यांना पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्षपदी नियुक्त केल्याचे पत्र दिले. नियुक्ती पत्र देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला प्रदेशाध्यक्ष अॅड वंदना चव्हाण, खासदार सुप्रिया सुळे, युवक शहराध्यक्ष इमरान शेख, कामगार नेते काशिनाथ नखाते, सचिन निंबाळकर, विशाल क्षीरसागर, विशाल शिंदे, शाहिद शेख,अशोक हरपळे पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, सुवर्णा वाळके, कविता देवकर, दिपाली पारखे, मनीषा निंबाळकर उपस्थितीत होते.
विशाल जाधव यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले, दिलेल्या संधीचे सोने करणार तळागाळातील प्रत्येक उपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचून प्रशासनातील समाजातील चुकीच्या गोष्टींबद्दल आवाज उठवत राहणार, प्रत्येक क्षण समाजासाठी अर्पण करणार अशा भावना व्यक्त केल्या.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल शहराध्यक्षपदी विशाल जाधव
Reviewed by ANN news network
on
८/२४/२०२३ ०२:४८:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/२४/२०२३ ०२:४८:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: