गॅस सिलेंडर वितरणाच्या नावाखाली अमली पदार्थ विकणारी टोळी अटकेत

 


पिंपरी : राजस्थानातून अफ़ूच्या बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) आणून त्यांची विक्री करणा-या तीन राजस्थानी तरुणांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ६० किलो अफ़ूच्या बोंडांचा चुरा जप्त करण्यात आला आहे. हे तिघे महाळुंगे, चाकण परिसरात घरगुती गॅस सिलेंडर वितरणाच्या नावाखाली हा अमलीपदार्थ विक्रीचा व्यवसाय चालवत होते.

राकेश जिवनराम बिष्णोई वय २४ वर्षे, कैलास जोराराम बिष्णोई वय २३ वर्षे आणि मुकेश गिरधारीराम बिष्णोई वय २३ वर्षे तिघेही राहणार कारवा हॉटेलमागे, काळे यांचे बिल्डींगमध्ये, म्हाळुंगे ता.खेड जि. पुणे मूळ राहणार राजस्थान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

अमली पदार्थ विरोधी पथकाला  म्हाळुंगे स्मशानभूमीेजवळ अविनाश पानसरे यांच्या गोडाऊनमध्ये काही व्यक्तींनी अफ़ूच्या बोंडांचा चुरा  हा अंमली पदार्थाची विक्रीकरीता साठवला असून ते विक्रीसाठी पॅकिंग करीत आहेत अशी माहिती मिळाली. पथकाने तेथे सापळा रचला असता घरगुती गॅस सिलेंडरने भरलेली एक टाटा एस गाडी गोडाऊनकडे येताना पोलिसांना दिसली पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये ३२ गॅस सिलेंडर आणि नायलॉनच्या पोत्यामध्ये ३ किलो अफ़ूच्या बोंडांचा चुरा आढळला. त्याच्याकडून मीळालेल्या माहितीवरून पोलिसानी गोडाऊनवर छापा घातला. त्यावेळी अन्य दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. 

पोलिसांनी गोडाऊनमधून  १६ लाख ७० हजार १२२रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये   ५८ किलो २८८ ग्रॅम अफ़ूच्या बोंडांचा चुरा, एक टाटा फोरव्हिलर टेम्पो, ०४ मोबाईल, ८२ गॅस सिलेंडर, ०१ वजनकाटा, ०१ मिक्सर, रिफलिंग पाईप, रोख रक्कम याचा समावेश आहे. हा अफ़ूच्या बोंडांचा चुरा आरोपींना पुरविणारा अनिलकुमार जाट रा. भेटजोन्डी राजस्थान आणि कोणताही भाडेकरार न करता आरोपींना या गुन्हेगारी कृत्यासाठी गोडाऊन भाड्याने देणारा अविनाश पानसरे राहणार म्हाळुंगे ता.खेड जि.पुणे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ (क), १५ ( क ), व २९, व भा.दं.वि.कलम ४२०, २८५, १८८, ३४ सह जिवनावश्यक वस्तु कायदा कलम १९५५ कलम ३, ७ एलपीजी (पुरवठा आणि वितरण नियम) आदेश २००० चे कलम ३,४,५,६,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक प्रशांत महाले,   उपनिरीक्षक राजन महाडीक, ज्ञानेश्वर दळवी, अंमलदार प्रदिप शेलार, अशोक गारगोटे, बाळासाहेब सुर्यवंशी, मयुर वाडकर, संतोष भालेराव, दादा धस, अजित कुटे, रणधीर माने, मितेश यादव, पांडुरंग फुंदे, बाळू कोकाटे यांनी केली.


गॅस सिलेंडर वितरणाच्या नावाखाली अमली पदार्थ विकणारी टोळी अटकेत गॅस सिलेंडर वितरणाच्या नावाखाली अमली पदार्थ विकणारी टोळी अटकेत Reviewed by ANN news network on ८/२४/२०२३ ०३:४५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".