शिवसेना सदस्य नोंदणी अभियानास सुरुवात
दिलीप शिंदे
सोयगाव : शिवसेना युवासेना ही युवकांच्या प्रश्नांवर काम करणारी,त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमात्र संघटना आहे. युवकांना समाजकारणात संधी देऊन त्यांना व्यक्त होण्यास व्यासपीठ देणारी संघटना आहे.विविध कला कौशल्य,शैक्षणिक उपक्रम राबवणारी संघटना आहे.समाजाचं ही काही देणं लागत या हेतूने जास्तीत जास्त युवकांनी सहभाग घ्यावा व विकासात्मक,सकारात्मक राष्ट्रनिर्मिती मध्ये आपले योगदान द्यावे असे आवाहन युवानेते उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी केले.
शहरात सोमवारी गांव तिथे शाखा-घर तिथे शिवसैनिक हे ध्येय घेऊन शिवसेना युवासेनेच्या वतीने जनसंपर्क अभियान व शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले.यावेळी अब्दुल समीर बोलत होते.
यावेळी नगराध्यक्षा आशाबी तडवी,शिवसेना तालुकाप्रमुख प्रभाकर काळे,संतोष बोडखे,गटनेते अक्षय काळे,शेख जावेद ,यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेना जनसंपर्क अभियान अंतर्गत हर घर दस्तक च्या माध्यमातून अब्दुल समीर यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्यांचे निवारण तात्काळ करण्यात येईल अशी ग्वाही दिली.यावेळी नगरसेवक भगवान जोहरे,गजानन कुडके,संदीप सुरडकर,अशोक खेडकर,कदीर शहा,राजू दुतोंडे, अक्षय इंगळे,किशोर मापारी,दिलीप देसाई,शरीफ शहा,हर्षल देशमुख,राधेश्याम जाधव,श्रावण राठोड, गणेश खैरे,सागर काळे आदींची उपस्थिती होती.
Reviewed by ANN news network
on
८/१५/२०२३ ०९:३०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: