पिंपरी पालिकेच्यावतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

 


पिंपरी : आज आपला भारताचा स्वातंत्र्यदिनाचा वर्धापन दिन आपण मोठया उत्साहात साजरा करत आहोत, मागील वर्षी आपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सुरूवात केली आणि शहरात विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. आता अमृतमहोत्सवाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने वाटचाल करताना “माझी माती माझा देश” हे अभियान महापालिकेच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांतिदिनापासून राबविले जात आहे. या कार्यक्रमांमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी तसेच शहरातील नागरिकांनी सहभाग दर्शवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सर्व शहरवासीयांना आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छाही देतो असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सकाळी ८.१५ वाजता भारतीय राष्ट्रध्वजाचा ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी कार्यक्रमात महापालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशामक दल तसेच तृतीयपंथी ग्रीन मार्शल, रिव्हर मार्शल आणि सुरक्षा दलाच्या वतीने सलामी देण्यात आली तसेच राष्ट्रगीत गायनानंतर सर्व उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेतली. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, मुख्य लेखापरिक्षक राजेंद्र भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, शहर अभियंता मकरंद निकम, माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर राजू मिसाळ, सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपआयुक्त रविकिरण घोडके, अजय चारठाणकर, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे ,ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवार, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे , सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, बाळासाहेब खांडेकर,यशवंत डांगे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, यांच्यासह महापालिका कर्मचारी महासंघाचे मनोजमाछरे,चारुशीला जोशी तसेच कर्मचारी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.

यावेळी तसेच स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांना जीवदान देणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार पदक आणि प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला, महापालिका,स्मार्ट सिटी आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत ऍकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना पुरस्कार देण्यात आले.. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत सकाळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी रक्तदान करून मानवतेच्या महान कार्यामध्ये सहभाग नोंदवला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड हेरिटेज वॉकचा शुभारंभ देखील आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाला हा उपक्रम शहरातील नागरिकांना शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मुळांशी जोडण्याचा एक दुवा असून रहिवासी आणि अभ्यासकांना शहराच्या इतिहासातील समृद्ध वारसा अनुभवता व पाहता येईल दरम्यान, राष्ट्रध्वजाचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर निगडी भक्ती शक्ती चौक या ठिकाणी शहिद क्रांतीकारकांना अभिवादन करून देशभक्तीपर गीतांचा आणि माझी माती माझा देश सुलेखनाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमात वृक्षारोपण आणि पंचप्रण शपथ घेण्यात आली यावेळी आमदार उमा खापरे,आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप,  प्राधिकरणाचे माजीअध्यक्ष सदाशिव खाडे, मोरेश्वर शेडगे, उप आयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि हजारो नागरिक उपस्थित होते

या कार्यक्रमात “भारत देश है मेरा” ,”सारे जहा से अच्छा हिन्दोस्ता हमारा” ‘ये देश है वीर जवानोका” अशी देशभक्तीपर गीते सुप्रसिद्ध गायक विवेक पांडे, आशिष देशमुख, पृथ्वीराज इंगळे आणि गायिका राधिका अत्रे यांनी सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. तर चिंतन मोढा यांनी त्यांना साथ देत अप्रतिम असे संगीत संयोजन करून उपस्थितांची मने जिंकली. शेवटी सुप्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव यांच्या सुरेख अशा सुलेखनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले

पिंपरी पालिकेच्यावतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा पिंपरी पालिकेच्यावतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा Reviewed by ANN news network on ८/१७/२०२३ १०:२८:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".