मराठवाडा : आदिवासी विद्यार्थ्यांना निंबायती येथे मोफत दप्तर वाटप, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मराठा प्रतिष्ठानचा उपक्रम
दिलीप शिंदे
सोयगाव : आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय मूलभूत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी सोमवारी (दि.१४) स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला एक हात मदतीचा या उपक्रमात २५० आदिवासी विद्यार्थ्यांना निंबायती येथे मोफत दप्तर वितरण करण्यात आले मराठा प्रतिष्ठांन व अशोक गोयल फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने निंबायती गाव येथे हा उपक्रम राबविण्यात आला आहे.यावेळी तहसीलदार मोहनलाल हरणे पोलीस निरीक्षक अनमोल केदार,मराठा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोपान गव्हांडे जिल्हाध्यक्ष विजय काळे, माजी सभापती चंद्रकांत पाटील,आदिवासी तडवी भिल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अलीबाबा तडवी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या उपक्रमात निंबायती येथील प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या २५० विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वितरण करण्यात आले यावेळी तहसीलदार हरणे पोलीस निरीक्षक अनमोल केदार सोपान गव्हांडे अली बाबा तडवी आदींनी मनोगत व्यक्त करून या सामाजिक उपक्रमातून सामाजिक एकता निर्माण व्हावी असे मत पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी व्यक्त करून आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरावी व मोठे व्हावे असे तहसीलदार हरणे यांनी सांगितले सोपान गव्हांडे यांनी सामाजिक हेतू बाळगून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची भावना व्यक्त केली मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर वितरण करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनुप तडवी,करीम तडवी ,आदींनी ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांच्या सत्कार केला यावेळी तालुकाध्यक्ष विजय चौधरी यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमासाठी सरपंच गणेश माळी,सोमु तडवी,समाधान घुले,प्रमोद वाघ नाब्बास तडवी जबिर तडवी,ज्ञानेश्वर युवरे विनोद पाटील,सुधाकर पाटील ज्ञानेश्वर गवळी ,दिनेश पाटील गणेश तायडे प्रशांत पाटील ,करीम तडवी,सिराज तडवी,शोएब तडवी,सुभेखा तडवी,जुबेर तडवी,शबानूर तडवी राईस तडवी आदींसह आदिवासी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. आभार गणेश माळी यांनी मानले...
Reviewed by ANN news network
on
८/१५/२०२३ ०९:३०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: