विशेष मुलांनी लुटला चित्रकलेचा आनंद
पुणे : आशा स्कूल, पुणे ही दिव्यांग विशेष मुलांची शाळा आर्मी वेल्फेयर एसोसिएशन (आवा) अंतर्गत चालवली जात असून, येथे भारताचा स्वातंत्र्यदिन मोठया उत्साहात विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे कर्नल जीएफए दगामारोसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते. मुख्याध्यापिका श्रीमती पल्लवी शर्मा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी विशेष मुलांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून मार्चपास्ट काढला. तसेच या मुलांसाठी आपले राष्ट्र, आपला अभिमान या विषयावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकही उपस्थित होते. देशभक्ती आणि आपल्या प्रिय राष्ट्र भारताबद्दल अभिमानाच्या गीतांनी वातावरण आशा स्कूलमध्ये बहरले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप करण्यात आले होते.
Reviewed by ANN news network
on
८/१७/२०२३ ११:५८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: