पुणे : पुण्यातील खराडी येथील फॉरेस्ट काउंटी हाऊसिंग सोसायटी रहिवासी संघटनेने, देशभक्ती आणि एकात्मतेचे मूलतत्त्व अंतर्भूत असलेला भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा केला. संपूर्ण राष्ट्राच्या भावनांचे प्रतिध्वनी करत येथील सर्व पिढ्यातील रहिवासी राष्ट्रीय अभिमानाच्या सामूहिक प्रदर्शनात एकत्र आले होते.
उत्सवाची सुरुवात सोसायटी मधील मुलांनी सोसायटी रक्षकांच्या नेतृत्वाखाली अनेक तास एकत्र सराव करून निर्दोष समन्वय साधत केलेल्या उत्साही परेडने झाली. त्यानंतर या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करत भारतीय राष्ट्रगीताच्या प्रतिध्वनीसह ध्वजारोहण समारंभ पार पडला. त्यानंतर एक अप्रतिम असा सांस्कृतिक कार्यक्रम झाला, ज्यामध्ये रहिवाशांनी देशभक्तीपर गाणी आणि भारताचा समृद्ध वारसा सांगणारे मनमोहक नृत्य सादर केले. टाळ्यांच्या गजरात झालेल्या या सादरीकरणावेळी आपल्या देशाच्या इतिहासाबद्दल रहिवाशांनी अभिमान आणि आदर व्यक्त केला.
याव्यतिरिक्त, पर्यावरणीय जाणीवेच्या विचारपूर्वक कार्यक्रमात सर्व सोसायटी सदस्यांनी सोसायटीच्या आवारात रोपे लावली. ही रोपे भविष्यातील पिढ्यांसाठी देशाच्या वनस्पती-प्राण्यांचे संगोपन करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतीक ठरतील. या रोपट्यांचे चांगल्या प्रकारे वाढलेल्या झाडांमध्ये संगोपन करण्याची आणि भारताच्या पर्यावरणाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा यावेळी रहिवाशांनी घेतली.
फॉरेस्ट काऊंटी हाऊसिंग सोसायटीच्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात भारताच्या लोकांची प्रगती, एकता आणि सामूहिक आणि शाश्वत वाढीसाठी वचनबद्धता वाढवणारी मूल्ये आहेत!
Reviewed by ANN news network
on
८/१७/२०२३ १२:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: