१ लाख ६७ हजार रुपयात मिळणार टॉर्क मोटर्सची क्रेटोस आर ‘अर्बन’ ट्रिम

 


पुणे:  टॉर्क मोटर्स या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनीने आज आपल्या क्रेटोसआर इलेक्ट्रिकल मोटरसायकलवर नवीन अर्बन ट्रिमचा समावेश केलारोजच्या प्रवासात दमदार कामगिरी हवी असणाऱ्या परंतु रेंजच्या बाबतीत तडजोड  करू इच्छिणाऱ्या शहरी रायडर्ससाठी हे नवे ट्रिम देण्यात आले आहे.

नव्या क्रेटोसआर अर्बन ट्रिममध्ये चांगली कामगिरी आणि व्यवहार्य रेंज यांचा मेळ घालण्यात आला असून तिची किंमत ,६७,४९९ रुपयेएक्स शोरूमपुणे ठेवण्यात आली आहे.

नव्या ट्रिमची घोषणा करताना टॉर्क मोटर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल शेळके म्हणालेदेशातील नव्या बाजारपेठांमध्ये उतरताना आमच्या असे लक्षात आलेकी आमच्या ग्राहकांची रायडिंग स्टाइल तसेच वापरण्याची पद्धत वेगवेगळी आहेनवीन अर्बन’ ट्रिम शहरी ग्राहकाच्या जबरदस्त कामगिरी  रेंजच्या अपेक्षा योग्य किंमतीत पूर्ण करणारी असून त्यामध्ये ग्राहकाला रोज लागणाऱ्या सर्व आवश्यक वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात आला आहेयामुळे ग्राहकांला निश्चित वेळमर्यादेमध्ये ती अद्ययावत करून घेण्याची सोयही मिळणार आहे.

सध्याच्या क्रेटोसआरवर आधारित असलेल्या अर्बन ट्रिममध्ये रोजच्या प्रवासासाठी आवश्यक असणारी वैशिष्ट्ये मर्यादित स्वरुपात देण्यात आली आहेनव्या ट्रिममध्ये शहरात फिरण्याच्या आनंदाबरोबरच क्रेटोसआरची सर्वाधिक वापरली जाणारी वैशिष्ट्यं तसेच घरीच चार्ज करण्याचा सेटअप देण्यात आला आहेया इलेक्ट्रिक मोटरसायकलमध्ये शहरी वापरासाठी खास मोड देण्यात आला असून त्यामध्ये ७० केएमपीएचचा सर्वोच्च वेग आणि १०० किलोमीटरची रेंज यांचा समावेश आहे.

स्टायलिंग आणि पॉवरट्रेनच्या बाबतीत या मोटरसायकलमध्ये बदल करण्यात आलेले नाहीतही मोटरसायकल तीन रंगात उपलब्ध असेल – स्ट्रीकी रेडओशनिक रेड आणि मिडनाइट ब्लॅकआधुनिक तंत्रज्ञानाचा यात समावेश करण्यात आला असून एक्सियल फ्लक्स’ मोटरला उर्जा देणारा . केडब्ल्यूएच लिआयन बॅटरी पॅक (आयपी ६७ रेटेडयात बसवण्यात आला आहेया पॅकला नुकतेच ९६ टक्के कार्यक्षमता दर्शवल्याबद्दल पेटंट देण्यात आले आहे.

सुरुवातीला ग्राहकांना ३० दिवसांच्या कालावधीसाठी सर्व वैशिष्ट्यांचा आनंद घेता येईलत्यामध्ये मल्टीराइड मोड्स (इकोसिटी आणि स्पोर्ट्स), रिव्हर्स मोडफास्टचार्जिंगइन नॅव्हिगेशनलाइव्ह डॅश ब्लुटुथव्हिइकल लोकेटरअँटीथेफ्ट यंत्रणाजिओफेन्सिंगचार्जिंग पॉइंट लोकेशनओटीए अपडेट्सराइड अनालिटिक्सट्रॅक मोड अनालिटिक्सस्मार्ट अनालिटिक्स आणि गाइड मी होम लाइट्स यांचा समावेश आहेही सर्व वैशिष्ट्ये वापरू इच्छिणाऱ्या ग्राहकांना वाहन खरेदी केल्यापासूनच्या सहा महिन्यांत २० हजार रुपये भरणे आवश्यक आहे.

क्रेटोसआर अर्बन ट्रिम लवकरच म्हणजे येत्या १५ ऑगस्टपासून भारतातील टॉर्क एक्सपिरीयन्स झोन्समध्ये उपलब्ध होईल.

१ लाख ६७ हजार रुपयात मिळणार टॉर्क मोटर्सची क्रेटोस आर ‘अर्बन’ ट्रिम १ लाख ६७ हजार रुपयात मिळणार  टॉर्क मोटर्सची क्रेटोस आर ‘अर्बन’ ट्रिम Reviewed by ANN news network on ८/१७/२०२३ ११:५६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".