'व्हिजन थार.ई'चे 'महिंद्रा'कडून अनावरण; आयकॉनिक एसयूव्हीचा ऑल-न्यू, बॉर्न इलेक्ट्रिक अवतार

 




• ब्रेकअवे डिझाइनचे धोरण : 'व्हिजन थार.ई' दर्शविते डिझाईनमधील क्रांतिकारी झेप; आयकॉनिक ब्रँडचा मजबूत 'डीएनए' आणि 'अशक्यप्राय गोष्टी साधा' या तत्त्वज्ञानावर भर.
• इलेक्ट्रिक इनोव्हेशन : अत्याधुनिक, उच्च-कार्यक्षमतेच्या 'एडब्ल्यूडी इलेक्ट्रिक पॉवरट्रेन'सह सुसज्ज असलेल्या 'इंग्लो-बॉर्न इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म'वर 'थार.ई'ची बांधणी, भविष्यकाळाचा धैर्याने वेध घेण्याचा दृष्टीकोन.
• शाश्वततेला कृतीतून महत्त्व : ५० टक्के रिसायकल्ड 'पीईटी' आणि रिसायकल करता येण्याजोगे अनकोटेड प्लास्टिक यांचा बांधणीमध्ये समावेश करून, 'थार.ई'चे पर्यावरण रक्षणासाठीच्या प्रामाणिक वचनबद्धतेचे दर्शन.
• कल्पक अभियांत्रिकी : अॅडाप्टेबल, मॉड्यूलर आणि अदलाबदल करण्याजोगे कॉम्पोनन्ट्स वापरल्यामुळे, 'थार.ई' दर्शवते इलेक्ट्रिक एसयूव्ही बांधणीमधील एक नाविन्यपूर्ण दृष्टीकोन.


केपटाऊन, १५ ऑगस्ट, २०२३ : 'महिंद्रा इलेक्ट्रिक ऑटोमोबाईल्स लिमिटेड' (एमईएएल) या 'महिंद्रा अँड महिंद्रा'च्या उपकंपनीतर्फे आज दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे 'सिग्नेचर फ्युचरस्केप इव्हेंट'मध्ये “व्हिजन थार.ई”चे अनावरण धडाक्यात करण्यात आले. 'थार.ई' हे थार या ऑफरोडर गाडीचे केवळ विद्युत स्वरुपच नाही, तर ही गाडी इतरही बरीच काही आहे. या गाडीमध्ये एक धाडसी, वेगळे डिझाइन परिवर्तन समाविष्ट आहे, जे महिंद्राच्या अस्सल एसयूव्हीच्या भावनेला मूर्त रूप देत राहते.
'महिंद्रा अँड महिंद्रा लि.'च्या ऑटोमोटिव्ह सेक्टरचे प्रमुख वीजय नाकरा म्हणाले, “व्हिजन थार.ई' हा आमच्या नावीन्यपूर्णतेचा एक दाखला आहे, तसेच ते एक अग्रेसर असे डिझाइन तत्वज्ञान आहे. ती 'महिंद्रा'ची खास ओळख आहे आणि तिला विशिष्ट जागतिक संदर्भ आहे. कोणतीही तडजोड न करता शोध घेण्याची तळमळ आपल्या सर्वांमध्ये असते, या साहसी वृत्तीला 'थार.ई' अनुरुप आहे. जबाबदार उपभोग या संकल्पनेच्या दिशेने जाणाऱ्या जागतिक चळवळीशी आम्ही संलग्न आहोत. म्हणूनच शाश्वत सामग्री वापरण्यावर आमचा भर असतो. आपला भोवताल सकारात्मकतेने समृध्द असावा, यासाठी आमचे प्रयत्न असतात. त्या दृष्टीने बनविण्यात आलेली 'थार.ई' ही खऱ्या अर्थाने कालातीत आहे आणि सध्याच्या काळाला अनुरुप आहे.”

'महिंद्रा अँड महिंद्रा लि.'चे चीफ डिझाईन ऑफिसर प्रताप बोस म्हणाले, “व्हिजन थार.ई' तयार करून आम्ही धाडसी आणि नाविन्यपूर्ण भविष्याचा स्वीकार केला आहे. 'महिंद्रा'च्या अत्याधुनिक सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण विचारांच्या वचनबद्धतेचा पुरावा म्हणून आमचे डिझाईन समोर येते. साहसी भावना जोपासत खडतर रस्त्यांवरून प्रवास करण्याची क्षमता ही 'थार'ची वैशिष्ट्ये आहेत. ती कायम ठेवत आता आम्ही इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या जगात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा प्रयत्न आणखी एक ऑफ-रोडर तयार करण्यापलीकडे जातो. वाहनांच्या डिझाईनमध्ये एक प्रगतीशील पाऊल टाकत आम्ही हे धोरण तयार केले आहे. यामध्ये आपला मूळ हेतू काय, याचे भान आम्ही विसरलेलो नाही. 'थार.ई' ही आमची रोमांचक आणि जबाबदार भविष्याची घोषणा आहे.”

अद्वितीय घटक :
'थार.ई'ची एकमेवाद्वितीय अशी मॉड्यूलर बांधणी आणि बदलता येण्याजोगे घटक यांच्यामुळे 'इलेक्ट्रिक एसयूव्ही'च्या क्षेत्रात ही गाडी आगळीवेगळी ठरते. या मजबूत डिझाइन तत्वज्ञानामुळे या 'एसयूव्ही'ला कालातीत स्वरुप आले आहे, तसेच कोणत्याही भूभागावर आत्मविश्वासाने चालविण्यास ती अनुकूल ठरते.

डिझाइन - मुख्य वैशिष्ट्ये :
• डिझाईनमधील नवीन मार्ग : 'थार.ई'चे डिझाइन स्वतःच एक नाविन्यपूर्ण आणि विशिष्ट मार्ग तयार करते. तरीही ती एक अस्सल 'ऑफ-रोड एसयूव्ही' राहते, तसेच थार या ब्रँडची दृढता आणि शोधाची भावना ती कायम राखते.
• बाह्य डिझाईन : 'थार.ई'च्या बाह्य रूपातून तिची अद्वितीयता, ताकद आणि नाविन्यता लक्षात येते. काटेकोर भौमितिक पृष्ठभागामुळे मजबूत ‘अशक्यप्राय ते साधा’ हे तत्त्व मूर्त रूपात समोर येते. उभ्या खिडक्यांसारख्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यामुळे गाडीला प्रशस्तपणा आला आहे, तो दबदबा निर्माण करतो.
• अंतर्गत डिझाइन : 'थार.ई'च्या आतील भागात मिनिमलिझम आणि कार्यक्षमता या दोन्ही गोष्टी आढळतात. ऑफ-रोड ड्रायव्हिंगसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींवर यामध्ये भर देण्यात आला आहे. मध्यवर्ती पिव्होटिंग स्क्रीन, मजबूत ग्रॅब हँडल्स आणि खडबडीत मांडणी यांसारखे घटक शहरी आणि ऑफ-रोड प्रवासी, या दोघांसाठी व्यावहारिक ठरतात.
• शाश्वत रचना : पन्नास टक्के रिसायकल केलेल्या पीईटीपासून बनवलेले फॅब्रिक आणि अनकोटेड रिसायकल करण्याजोगे प्लास्टिक यांची कटिबद्धता या गाडीमध्ये व्यवस्थित पाळण्यात आली आहे. 'थार.ई'मधील साधेपणा हा शाश्वततेच्या जवळ जाणारा आहे.


'व्हिजन थार.ई'च्या माध्यमातून इलेक्ट्रिक मोबिलिटीचे भविष्य अनुभवण्यासाठी महिंद्रा तुम्हाला आमंत्रित करीत आहे. या गाडीच्या रुपाने एक खराखुरा आयकॉन पुन्हा प्रस्थापित होणार आहे. गाडीची धाडसीपणाने केलेली रचना, तिची शाश्वतपणाची बांधिलकी आणि तिला असणारा चिरस्थायी वारसा या गोष्टी आताच्या काळातील एक प्रतीक निर्माण करतात. 'व्हिजन थार.ई'सह इलेक्ट्रिक वाहनांची क्रांती अनुभवा. ही पुढील पिढ्यांसाठीची अल्टीमेट 'ऑफ-रोड एसयूव्ही' आहे.

'व्हिजन थार.ई'चे 'महिंद्रा'कडून अनावरण; आयकॉनिक एसयूव्हीचा ऑल-न्यू, बॉर्न इलेक्ट्रिक अवतार 'व्हिजन थार.ई'चे 'महिंद्रा'कडून अनावरण; आयकॉनिक एसयूव्हीचा ऑल-न्यू, बॉर्न इलेक्ट्रिक अवतार Reviewed by ANN news network on ८/१७/२०२३ १२:०९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".