पिंपरी : स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ करण्यासाठी मनापासून सेवा करणाऱ्या सफाई सेवक महिलांच्या हस्ते आजच्या स्वातंत्र्य दिनाचे झेंडावंदन दिघी येथे संतोष तानाजी वाळके यांच्या पुढाकाराने करण्यात आले. संतोष वाळके यांनी सफाई सेवक महिलांना दिलेला हा सन्मान इतर लोकांना आदर्श व्रत ठरेल असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग प्रमुख कृष्णकांत वाळके यांनी सांगितले.
मंगळवारी (दि.१५) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंपरी चिंचवड शहर संघटक संतोष तानाजी वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा दिघी यांच्या वतीने ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिघी येथे झेंडा वंदन करण्यात आले. यावर्षीचे झेंडा वंदन हे आवर्जून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिघी मधील आरोग्य विभागाच्या सफाई सेवक महिला सुषमा जाधव, सत्यभामा उपाडे, रुक्मिणी खरात, लक्ष्मी घोडेकर, अनिता डोळस, सुगंधा भालचिम, मीरा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना उपविभाग प्रमुख मनोज परांडे, कैलास विठ्ठल तापकीर, पिंपरी चिंचवड मनपा शाळेतील क्रीडाशिक्षक हरिभाऊ साबळे, डॉ. अविनाश वाळुंज, पुनाजी आंबवणे, मंगेश देशमुख, विलास साबळे, प्रदीप घुटे तसेच सामाजिक कार्यकर्ते
तुकाराम महाजन, आनंदराव सूर्यवंशी, अभिजीत जाधव, सुनील गंभीर, राजकुमार बांगर, महेश बांगर, दत्तात्रय बांगर, सुखदेव तांदळवाडी, संजय हरिभाऊ वाळके आदींसह दिघी परिसरातील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
यावेळी संतोष तानाजी वाळके यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा राष्ट्रीय स्वच्छता स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळावा यासाठी दिघी शिवसेना शाखेच्या वतीने या परिसरात आगामी काळात मोठ्या प्रमाणात स्वच्छ्ता अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे असे सांगितले आणि सर्व नागरिकांना गुलाब पुष्प देऊन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
दिघी शिवसेना शाखेच्या वतीने सफाई सेवक महिलांच्या हस्ते झेंडावंदन
Reviewed by ANN news network
on
८/१७/२०२३ १२:१२:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/१७/२०२३ १२:१२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: