हिंदू जागृत झाले, तर विश्वातील कुठलीही शक्ती हिंदूंच्या परंपरांशी खेळू शकणार नाही! : डॉ. अवधेशपुरी महाराज


 ‘पशुप्रेम केवळ हिंदू यात्रांमध्ये, ईदच्या वेळी का नाही ?’ या विषयावर विशेष संवाद !

उज्जैन (मध्यप्रदेश) येथे भगवान श्री महाकाल यांच्या शोभायात्रेमध्ये असणार्‍या हत्तीवर ‘पीपल्स फॉर एनिमल्स’ (PFA) चे सचिव प्रियांशु जैन यांनी आक्षेप घेतला आहे. बकरी ईदच्या वेळी लाखो बकर्‍यांची हत्या केली जाते. दररोज हजारो गायींची हत्या होत असते. जैन समाजाच्या शोभायात्रांत ‘इंद्र-इंद्राणी’च्या भूमिकेत असलेले घोडे आणि हत्ती यांवर सवारी केली जाते. तेव्हा त्याला विरोध केला जात नाही. भगवान श्री महाकाल यांच्या शोभायात्रेमध्ये हत्तीवर सवारी या परंपरेविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि भविष्यातही ही शोभायात्रा परंपरेनुसारच काढली जाईल. हिंदु जागृत झाले, तर विश्वातील कुठलीही ताकद हिंदूंच्या परंपरांशी खेळ करू शकणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन उज्जैन येथील स्वस्तिक पिठाचे पीठाधीश्वर परमहंस डॉ. अवधेशपुरी महाराज यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘पशुप्रेम केवळ हिंदु यात्रांमध्ये, ईदच्या वेळी का नाही?’ या विषयावर आयोजित विशेष संवादात ते बोलत होते.

या वेळी डॉ. अवधेशपुरी महाराज पुढे म्हणाले की, हिंदूंच्या सहिष्णुतेचा, उदारतेचा कोणी दुरूपयोग करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. हिंदु धर्म, संस्कृती आणि परंपरा यावर कोणी आक्षेप घेत असेल, तर हिंदूंनी एकजुटीने त्याला विरोध केला पाहिजे आणि हिंदु संस्कृती, परंपरा आणि धर्माच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे. 

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नागेश जोशी म्हणाले की, हिंदु धर्मातच सण-उत्सवांत पशुंची पूजा होते, अन्य धर्मियांच्या सण-उत्सवांत पशुंची मोठ्या प्रमाणावर हत्या होते. हिंदूंच्या सण-उत्सवांत मनुष्य आणि पशुंममध्ये समन्वय साधला जातो आणि एकमेकांत प्रेम निर्माण केले जाते; मात्र यावरसुद्धा आक्षेप घेतला जातो. हिंदु धर्मातील सण-उत्सवांत प्राण्यांशी क्रूरतेचा व्यवहार केला जातो, असे खोटे चित्र निर्माण केले जाते. हिंदूंच्या प्रथा, परंपरा यांना लक्ष्य केले जाते. पेटा (PETA), पी.एफ.ए. (PFA) या संस्था केवळ कुत्रा, मांजरी, घोडा यांच्या रक्षणासाठी काम करतांना दिसतात; मात्र प्रतिदिन गायींची हत्या केली जाते त्यासाठी या संस्था धावून येत नाही. तेव्हा फक्त गोरक्षक धावून येतात. गाय यांच्या पशुच्या व्याख्येत बसत नाही का? हिंदु धर्मात जे पूजनीय प्राणी आहे त्यांच्यासाठी हे काही करणार नाहीत, हे यांच्या षड्यंत्राद्वारे स्पष्ट होत आहे. 

ज्याप्रमाणे जुनी दंडसंहिता सरकारने रहित करून भारतीय न्याय संहिता आणली आहे, त्याप्रमाणे पाश्यात्त्य विचारधारेने प्रेरीत असलेले पशुंविषयीचे वर्ष 1960 पासून चालत आलेले जुने कायदे रद्द करून भारतीय संस्कृतीने विचारधारेने प्रेरीत असलेले नवीन कायदे सरकारने आणले पाहिजेत, असेही श्री. जोशी शेवटी म्हणाले. 

हिंदू जागृत झाले, तर विश्वातील कुठलीही शक्ती हिंदूंच्या परंपरांशी खेळू शकणार नाही! : डॉ. अवधेशपुरी महाराज हिंदू जागृत झाले, तर विश्वातील कुठलीही शक्ती हिंदूंच्या परंपरांशी खेळू शकणार नाही!  : डॉ. अवधेशपुरी महाराज Reviewed by ANN news network on ८/१७/२०२३ ११:५५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".