दूषित पाणी प्यायल्याने नागरिक दगावायची वाट पालिका प्रशासन पहात आहे का? : नाना काटे

 


पिंपरी : पवना नदीवर थेरगाव येथे असलेल्या  केजूदेवी बंधा-यातील पाणी प्रदूषित झाले असून आज २१ ऑगस्ट रोजी पाण्यावर मोठ्या प्रमाणात फ़ेस निर्माण झाला आहे.  काही कंपन्या त्यांच्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते नदीपात्रात सोडत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. या बंधा-यातून पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा होतो. त्यामुळे हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे. दूषित पाणी प्यायल्याने नागरिक दगावायची वाट पालिका प्रशासन पहात आहे का? असा संतप्त सवाल पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते नाना काटे विचारला आहे. 

काटे यांनी या बाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीवरील थेरगाव येथील केजूदेवी बंधारा परिसरात नदीच्या पाण्यावर आज दि.२१ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी  मोठ्या प्रमाणात पांढरा फेस आलेला दिसून आला. काही कंपन्या व उद्योगाचे रासायनिक सांडपाणीही प्रक्रिया न करता नदीपात्रात मिसळत आहे. तसेच, अनेक नाले थेट नदीत मिसळत आहेत. या कारणांमुळे संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरासाठी वरदायनी असणार्या पवनामाई नदीची दुरवस्था झाली आहे. असे असताना आपल्या महापालिका पर्यावरण विभाग दिखाव्यासाठी नाममात्र कारवाई करतात. मात्र संपूर्ण शहराला पाणी पुरवठा करणारी पवना माई दूषित करणाऱ्यावर कडक कारवाई कधी करणार ! की दुषित पाणी पिल्याने नागरिक दगवायची किवा मोठी घटना घडण्याची वाट बघत आहे का ?  आयुक्त महोदय पालिकेने शहरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा करण्याचे पाप माथी घेऊ नये, मागील जुलै महिन्यात १६ जुलै २०२३ रोजी पवना नदी पात्रता असाच फेस आला होता. त्यावेळी काही लॉंड्री व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला होता. नदी प्रदूषणात व्यवसाय करणाऱ्या बरोबर पावसाच्या वाहते पाणी, जलपर्णी, माती, कचरा, राडारोडा घाण मिसळते आणि पाणी दुषित होते. याशिवाय घराच्या छोट्या कारणाने पाणी प्रदूषित होतच असते. नदीनाल्यात वाहने धुणे, वेगवेगळी रसायन पाण्यात सोडणं, कारखान्यांची वेस्ट वॉश डायरेक्ट पाण्यात सोडणं. केमिकलनं माखलेले कपडे – वस्तू पाण्यांत टाकणे, ड्रेनेजचे पाणी थेट नदीपात्रात सोडणे असे अनेक प्रकार वारंवार होताना दिसत आहेत. शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी व मुळा नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. महापालिकेने पुढाकार घेत दोन्ही नद्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी अपेक्षित उपाययोजनांची गरज आहे. नदीपात्रामध्ये मिसळणारे सांडपाणी, बांधकामाचा राडारोडा टाकून केले जाणारे अनधिकृत भराव व त्यामुळे अरुंद होणारे नदीपात्र यामुळे नदी सुधार प्रकल्प राबविण्याचे नियोजन तातडीने करावयास हवा. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प गेली नऊ वर्ष रखडलेल्या अवस्थेत आहे. केवळ पवना व इंद्रायणी नदी सुधारसाठी कोट्यावधी रुपये निधीची तरतूद कागदावर न करता तातडीने अंमलबजावणी करावी.

दूषित पाणी प्यायल्याने नागरिक दगावायची वाट पालिका प्रशासन पहात आहे का? : नाना काटे दूषित पाणी प्यायल्याने नागरिक दगावायची वाट पालिका प्रशासन पहात आहे का? : नाना काटे Reviewed by ANN news network on ८/२१/२०२३ ०१:५९:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".