नाना काटे यांच्या प्रयत्नांना यश!; अनेक दिवस रखडलेले पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु
पिंपरी : प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन रोड वरील पीस व्हॅली सोसायटी ते साई पर्ल सोसायटी पर्यंत, तसेच राजमाता जिजाऊ उद्यान ते कुंजीर चौक साई प्लाटीनिम सोसायटी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस काही कारणास्तव पाण्याची नवीन लाईन टाकण्याची राहिली होती.
नाना काटे यांनी वेळोवेळी महापालिकेच्या संबंधित अति.आयुक्त तसेच पाणी पुरवठा विभाग यांच्याकडे पत्राद्वारे व भेट घेवून पाठपुरावा केला होता, तसेच राजमाता जिजाऊ उद्यान लगत नवीन २५ लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकीन बांधून तयार आहे परंतु हे पाईप लाईन टाकण्याचे काम रखडल्यामुळे या सोसायटी ना पाणी पुरवठा करण्यास अडचण निर्माण होत होती, यामुळे नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत होते, हि बाब लक्षात घेता मागील आठवड्यात संबंधित पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत योग्य पर्याय काढून लवकरात लवकर या १२ इंच नवीन पाण्याच्या पाईप लाईनचे काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानुसार नाना काटे व शितल काटे याच्या पाठपुराव्यास यशप्राप्ती म्हणून कुणाल आयकॉन रोड वरील पीस व्हॅली सोसायटी ते साई पर्ल सोसायटी पर्यंत, तसेच राजमाता जिजाऊ उद्यान ते कुंजीर चौक साई प्लाटीनिम सोसायटी पर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूस आज १२ इंच व्यासाची पिण्याच्या पाण्याची लाईन टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली त्यामुळे या कुणाल आयकॉन रोड वरील संबंधित सोसायटीना नवीन बांधलेल्या २५ लाख लिटर पाण्याच्या टाकीमधून मुबलक व योग्य प्रमाणत पुरवठा करण्यास सोपे जाणार आहे.
नाना काटे यांच्या प्रयत्नांना यश!; अनेक दिवस रखडलेले पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु
Reviewed by ANN news network
on
८/२९/२०२३ ०६:२९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/२९/२०२३ ०६:२९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: