कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत एक राखी जवानांसाठी; एअरफोर्स स्टेशनला राख्या रवाना!!

 

दापोली : येणाऱ्या रक्षाबंधन उत्सवाचे औचित्य साधून, गतवर्षी प्रमाणे कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत एक  राखी जवानांसाठी या उपक्रमाचे आयोजन यावर्षी देखील करण्यात आले . दापोली तालुक्यातील विविध प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, कॉलेजेस इ. ठिकाणून विद्यार्थिनींना आवाहन करुन या राख्या एकत्रित करण्यात आल्या. एक राखी जवानांसाठी या उपक्रमाच्या संयोजक 'नूतन वैद्य' यांनी दिलेल्या माहितीनुसार काही राख्या एअरफोर्स बेस स्टेशन पठाणकोट येथे रवाना करण्यात आल्या असून उर्वरित काही राख्या पुणे येथील Artificial Limb Center म्हणजे जवानांसाठीच्या कृत्रिम अवयव केंद्रात जाऊन रक्षा बंधनाच्या दिवशी बांधण्यात येणार आहेत. या उपक्रमा दरम्यान प्रतिष्ठानची संपूर्ण युवा टीमचे सदस्य सावनी जोशी, संपदा माने, अनन्या वैशंपायन, श्रीप्रिती वैद्य, साक्षी करमरकर, वेदवती परांजपे, ऋजुता जोशी, वैष्णवी जोशी, श्रुती बिवलकर तसेच रोहन भावे, कपिल करंदीकर, अनिरुद्ध भागवत, कौस्तुभ दाबके, कणाद जोशी, संदीप गरंडे, ओंकार बेडेकर, अभिजित परांजपे, प्रमोद पांगारकर, ई. सर्वांनी विविध ठिकाणी संपर्क करून उपक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

आपण सर्व सण उत्सव ज्यांच्यामुळे साजरे करतो त्या जवानांप्रति आपला आदर आणि प्रेम व्यक्त करणारा हा उपक्रम असल्याचे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी नमूद केले.

कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत एक राखी जवानांसाठी; एअरफोर्स स्टेशनला राख्या रवाना!! कृष्णामामा महाजन स्मृती प्रतिष्ठान मार्फत एक  राखी जवानांसाठी; एअरफोर्स स्टेशनला राख्या रवाना!! Reviewed by ANN news network on ८/२९/२०२३ ०८:५३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".