बाबू डिसोजा, कुमठेकर
निगडी प्राधिकरण : दि.१२ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ महिला विभागातर्फे विश्व हिंदू परिषद संचलित वनवासी विद्यार्थी वसतिगृह, तालुका खेड राजगुरुनगर, जिल्हा पुणे, येथे विभागाच्या कार्याध्यक्ष सौ. अश्विनी अनंतपुरे, सहकार्याध्यक्ष सौ. वैदेही पटवर्धन, अध्यक्ष सौ. नेहा साठे, सचिव सौ. हर्षदा पोरे, कोषाध्यक्ष सौ. स्वाती जोशी, तसेच विभागाच्या सदस्य सौ. शितल गोखले, सौ. राधिका सुखटणकर अणि सौ. उज्ज्वला जाधव यांनी भेट दिली.
दि. ८ ऑगस्ट २०२३ रोजी "एक मूठ धान्य" उपक्रमाअंतर्गत जमा झालेले धान्य - ज्वारी, गहू, तांदूळ, मूग डाळ, शेंगदाणे आणि तेल वनवासी विद्यार्थी वसतिगृह येथे भेट देण्यात आले.
तसेच दान पात्र योजने अंतर्गत जमा झालेल्या रकमेचा धनादेश श्री. दिलीप देशपांडे, वसतिगृह पालक, यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
वसतिगृह पालक, श्री. दिलीप देशपांडे, यांनी संस्थेची माहिती करून दिली. तसेच विभागाच्या कार्याध्यक्ष सौ. अश्विनी अनंतपुरे यांनी वरील उपक्रमांची माहीती सांगितली.
यावेळी संस्थेचे अधिक्षक श्री. अमोल सुधाकर डमरे तसेच सहाय्यक श्री. शिवराम काशिनाथ गवळी व सौ. उषा शिवराम गवळी उपस्थित होते.
वसतिगृहातील मुलांनी 'आम्ही डोंगरचे राहणार, चाकर शिवबाचे होणार' हे पद्य सादर केले.यावेळी उपस्थित महिला सदस्यांनी त्यावर ताल धरला.
"एक मूठ धान्य "उपक्रमांतर्गत वनवासी विद्यार्थी वसतीगृहास धान्य आणि धनादेश वाटप
Reviewed by ANN news network
on
८/१३/२०२३ १२:४५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/१३/२०२३ १२:४५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: