प्रा. हरी नरके हे परखड, व्यासंगी विद्यापीठ : मसूद पटेल

 


बाबू डिसोजा, कुमठेकर

पुणे, वानवडी  :  ज्ञानाई फाऊंडेशन आयोजित "विचारांच्या पाणवठयावर  "या शीर्षकाखाली निमंत्रित कवी कवयित्रींचे कविसंमेलन आयोजित केले होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार मसूद पटेल ,उद्घाटक अशोक कांबळे,माजी डी.वाय. एस.पी. ,प्रमुख पाहुणे प्रा सूर्यकांत नामगुडे, कुमार आहेर,  सुधाकर फुले व्याख्याते समता चळवळीचे कांतीलाल गवारे, छगन वाकचौरे, जगदीप वनशिव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लोककवी सीताराम नरके हे हजर होते.  प्रा हरी नरके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

सुरुवातीला भारताच्या संविधानाचे पूजन करण्यात आले . उद्घाटक अशोक कांबळे माजी अधिकारी इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते हरी नरके यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .  हार, पुष्पगुच्छ ,अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलित केली . सुप्रसिद्ध वृत्त निवेदिका गायिका कवयित्री जयश्री सोनवणे यांनी श्रद्धांजली पर गीत सादर केले. 
प्रास्ताविक लोककवी सीताराम नरके यांनी केले. 

कार्यक्रमाचे  कुमार आहेर यांनी मी महात्मा फुले बोलतोय एकपात्री प्रयोग सादर करून रसिकांना वेगळी मेजवानी विचार वारस जपत समाजप्रबोधन करणारे आतापर्यंत हजारो प्रयोग त्यांनी सादर केले आहेत. 

किशोर टिळेकर ,आनंद गायकवाड, चंद्रकांत जोगदंड ,जनाबापू पुणेकर ,दत्तात्रय केंजळे, रामचंद्र गुरव, पांडुरंग म्हस्के, जयश्री सोनवणे ,अमिनिरूस्सा शहा, दीपिका कटरे ,आशा शिंदे, गिरीश जाधव ,धर्मा शिंदे, शामराव कांबळे ,देविदास झुंरूगे , राहुल भोसले आदि कवी कवयित्री यांनी वैचारिक, मार्मिकपणे मंथन करणारी ,समाज प्रबोधन करत कवितेचे सादरीकरण केले. 

अध्यक्षीय भाषणात मसूद पटेल म्हणाले,  ज्येष्ठ विचारवंत चळवळीचे शिलेदार प्रा हरी नरके सर यांचे निधन ही विविध परिवर्तन वारी चळवळीला आणि ज्ञान क्षेत्राला हानी पोहचवणारी अत्यंत दुःखद घटना आहे. 
धक्कादायक आणि मनाला प्रचंड वेदना  देणारी घटना घडली असून एक साहित्यिक अभ्यासक व साक्षेपी संपादक म्हणून त्यांनी महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित अनेक पुस्तके लिहिली हरी नरके यांच्या लेखणीचा हा लहेजा जगावेगळा होताच त्यांनी बुध्दीमत्ता आणि व्यासंग जपला. 

पंडित्याचे प्रदर्शन न करता बौध्दिक क्षमता विकसित करण्यासाठी सत्य जगासमोर मांडताना वंचित शोषित समाजाच्या हितासाठी पूरक ठरेल असे विचार मांडत असताना पुणे विद्यापीठला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाव देण्यात प्रा हरी नरके यांचा खारीचा वाटा होता या महान कार्याची महती सर्व जणांना ज्ञात आहे, असे मसूद पटेल म्हणाले.
प्रा. हरी नरके हे परखड, व्यासंगी विद्यापीठ : मसूद पटेल प्रा. हरी नरके हे परखड, व्यासंगी विद्यापीठ :  मसूद पटेल Reviewed by ANN news network on ८/१३/२०२३ १२:५५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".