पुणे : हिंदू महासंघातर्फे देण्यात येणारा 'श्रीमंत पेशवा युवा उद्योजक पुरस्कार'अभिषेक जोशी यांना जाहीर झाला आहे.श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या ३२३ व्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.हा कार्यक्रम रविवार,दि.२० ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सभागृह,टिळक रस्ता येथे होईल.प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ.प्रमोद चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.अभी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.जितेंद्र जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
या कार्यक्रमाला सौ.अदिती अत्रे-पेशवा आणि उद्योग मार्गदर्शक मिलिंद तारे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.चैतन्य जोशी, अभिषेक जोशी,एड.नीता जोशी,संगीता गोडबोले,योगिनी शुक्ला,दिनकर सापनाईकर (बार्शी) या उद्योजकांचा देखील पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे.हिंदू महासंघाचे संस्थापक आनंद दवे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली
Reviewed by ANN news network
on
८/१९/२०२३ ०१:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: