चिपळूण व पिंपळगाव हरेश्वर येथील घटनेचा निषेध, महाराष्ट्र नाभिक महामंडळाकडून तहसीलदार व सोयगाव पोलीस ठाण्यात निवेदन
दिलीप शिंदे
सोयगाव : चिपळूण व पिंपळगाव हरेश्वर जि. जळगाव येथील घटनेच्या निषेधार्थ दि.११ शुक्रवारी महाराष्ट्र नाभिक महामंडळ सोयगाव तालुक्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करून या घटनेची कसून चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन सोयगाव तहसील व पोलीस ठाण्यात देण्यात आले.
दरम्यान कु.नीलिमा सुधाकर चव्हाण प्रकरणात दहा दिवसांचा कालावधी लोटला असून पोलिसांना आरोपी शोधण्यास अपयश आले आहे. तर पिंपळगाव हरेश्वर जि जळगाव येथील एका अल्पवयीन व मतिमंद असलेल्या नाभिक समाजाच्या कन्येचा एक मुस्लिम वृद्धाने अतिप्रसंग करून तिचा विनयभंग केला आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षिदार असतानाही आरोपी विरुद्ध कठोर कारवाई झालेली नाही. या दोन्ही प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद वाटत आहे. शांत तथा सहिष्णू असलेल्या नाभिक समाजावर राज्यात सतत अन्याय अत्याचार होत असून अनेक ठिकाणी तर हिनतेची वागणूक स्थानिक लोकांकडून मिळत असल्याने राज्यातील कायदा सुव्यवस्था जागेवर आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही प्रकरणात न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र नाभिक महामंडळ तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात १५ ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात येईल वेळप्रसंगी उपोषणही करण्यात येईल असे तहसीलदार व सपोनि यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर महाराष्ट्र नाभिक महामंडळ उपतालुका प्रमुख बापूराव पंडित,सचिव महेश एलिस, शहरप्रमुख नितीन सोनवणे,योगेश निकम,रामा एलिस, ललित पंडित,गणेश नेरपगारे, सागर पंडित,अजय नेरपगारे,देवेंद्र पंडित आदींसह नाभिक बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.यावेळी नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
८/१२/२०२३ ०८:३२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: