तीन इमारतीच्या बांधकामासाठी २८ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी..वाळू मात्र मातीमिश्रित
दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान टाईप १,३,४ इमारत बांधकामसाठी ९.८५ कोटी रु, सोयगाव पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थान टाईप-२ इमारत बांधकामासाठी १०.८३ कोटी रु व पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारत बांधकामसाठी ७.७५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.अल्पसंख्याक विकास,औकाफ व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दि.११ शुक्रवारी या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबाद, उपविभाग फरदापुर अंतर्गत केले जाणार आहे.ना.अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सोयगाव पंचायत समिती नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र ठेकेदाराने भूमिपूजन अगोदरच इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास वीस ब्रास मातीमिश्रित वाळू बांधकाम ठिकाणी साठवून ठेवली आहे. भूमिपूजन कोनशिले पासून दहा फूट अंतरावर असलेल्या माती मिश्रित वाळूसाठ्याकडे नामदारांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने एक प्रकारे मूक संमतीच दिली. त्यामुळे इमारतीचे काम निकृष्ठ दर्जाचे होणार असल्याची चर्चा भूमिपूजन कार्यक्रम स्थळी रंगली होती.
दरम्यान यावेळी गटविकास अधिकारी अहिरे, सार्वजनिक बांधकाम उपविभाग फरदापुर उपअभियंता टाकसाळ,नगराध्यक्ष आशाबी तडवी, शहरप्रमुख संतोष बोडखे, गटनेते अक्षय काळे, कुणाल राजपूत, समाधान तायडे, हर्षल काळे, भगवान जोहरे, योगेश पाटील,दिलीप देसाई,कदीर शहा, राजू दुतोंडे,किशोर मापारी, शेख रउफ, आदींची उपस्थिती होती.
Reviewed by ANN news network
on
८/१२/२०२३ ०८:२९:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: