पिंपरी : डॉ. डी. वाय पाटील (अभिमत) विद्यापीठाचा 14 वा पदवीप्रदान समारंभ या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. पिंपरी येथील विद्यापीठाच्या सभागृहात सोमवार, दि. 14 ऑगस्ट 2023 रोजी, सकाळी 11 वाजता हा समारंभ होणार आहे.
या कार्यक्रमात कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, डॉ. प्रमोद चौधरी - कार्यकारी अध्यक्ष - प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, पुणे व डॉ. पी. एन. राजदान - प्रमुख सल्लागार क्वालिटी अॅश्युरन्स अँड एक्सलन्स सेल रमाय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, बंगलोर व माजी कुलगुरू डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पुणे यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
या समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांमधील परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या 33 विद्यार्थ्यांना या वेळी सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात येईल. विविध विद्याशाखेतील 4095 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात येत असून यामध्ये 14 विद्यावाचस्पती (पीएच.डी.), 3015 पदव्युत्तर पदवी, 1055 पदवी व 11 पदविका या अशा एकूण 8 विद्याशाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येईल.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे, कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. भाग्यश्रीताई पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त व संचालिका डॉ. स्मिता जाधव विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील यांच्या उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे.
Reviewed by ANN news network
on
८/१२/२०२३ ०८:४४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: