दिलीप शिंदे
सोयगाव : शरद बाबुराव रोटे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक औरंगाबाद यांनी दि.१९ बुधवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून नांदगाव तांडा येथील चार जणांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवैधरित्या दारू विक्रीवर केसेस करण्याकरिता शरद रोटे, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक औरंगाबाद व जवान हे नांदगाव तांडा येथे गेले असता तेथील हॉटेल ओमसाईवर दि.१९ बुधवारी संध्याकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास छापा टाकून दारू पकडली असता यातील आरोपीने फिर्यादी व पथकातील जवानांनी छापा टाकल्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत चापट बुक्क्यांनी मारहाण करून धमक्या देऊन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी बद्री महारू राठोड(वय ३९) संदीप बद्री राठोड(वय २३) किरण बद्री राठोड(वय २१) आणि राहुल भरत राठोड(वय २२) यांच्यावर भादवी ३५३ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील संदीप राठोड ब राहुल राठोड या आरोपींना दि.१९ बुधवारी रात्री अटक करून दि.२० गुरुवारी सोयगाव येथील दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघे आरोपींना दि.२४ सोमवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.बद्री महारु राठोड व किरण बद्री राठोड हे दोन आरोपी फरार आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक मनीष कालवानिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनमोल केदार, दिलीप पवार, राजू बर्डे,रवींद्र तायडे, अजय कोळी,नारायण खोडे,तडवी आदी पुढील तपास करत आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक औरंगाबाद विभागाची दुटप्पी भूमिका---
दि.१९ बुधवारी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी राज्य महामार्ग क्रमांक २४ पासून जवळपास एक किलोमीटर अंतर असलेल्या नांदगाव तांडा येथील हॉटेल ओमसाई वर छापा टाकला.मात्र राज्य महामार्ग क्रमांक २४ असलेल्या सोयगाव चाळीसगाव रस्त्यावरील जरंडी,निंबायती फाटा,रामपुरा, बहुलखेडा, तिखी, उमरविहिरे,नांदगाव,वरठाण, बनोटी,किन्हि, गोंदेगाव आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैधरित्या देशीदारुसह गावठी दारूची सर्रास विक्री केली जात आहे. रस्त्यालगत असलेल्या ढाब्यावर राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांची वक्रदृष्टी का पडत नाही अशी चर्चा तालुक्यात रंगली आहे.
Reviewed by ANN news network
on
७/२१/२०२३ ०१:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: