नवीन शैक्षणिक वर्षास उत्साहात प्रारंभ
पुणे :भारती अभिमत विद्यापीठाच्या 'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट( आयएमईडी) मध्ये एमबीए,एमसीए अभ्यासक्रमाच्या नव्या तुकडीच्या विद्यार्थ्यांसाठी दि. १० जुलै ते २९ जुलै दरम्यान इंडक्शन प्रोग्रामचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. २९ जुलै पर्यंत हा इंडक्शन प्रोग्रॅम चालणार आहे. विद्यार्थ्यांच्या नव्या तुकडीच्या पायाभरणीसाठी शैक्षणिक,कारकिर्दविषयक समुपदेशन आणि क्रीडा विषयक सत्रांचे आयोजन या कालावधीत करण्यात आले आहे.
युन क्यून्ग की (दक्षिण कोरिया),डॉ.योगेश पवार,अनिरुद्ध सूर्यवंशी,शिल्पा खटके,रेशु अगरवाल,बिनीतसिंग,सोनिया बिलोर,अहुजा,डॉ.प्रीतम तिवारी,विशाल मेथी,संजय गांधी, सागर चोंढे यांची मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली.भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि 'इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी) चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते . उपप्राचार्य डॉ रामचंद्र महाडिक यांनी आयोजन केले.
दीपक नवलगुंद, डॉ. सोनाली धर्माधिकारी, डॉ प्रवीण माने, डॉ श्रद्धा वेर्णेकर, डॉ सत्यवान हेम्बाडे,डॉ स्वाती देसाई,दीप्ती देशमुख, डॉ प्रमोद पवार,डॉ नेताजी जाधव,डॉ.हेमा मिर्जी ,राहुल जोशी,डॉ भारती जाधव ,डॉ सचिन आयरेकर ,श्रेयस डिंगणकर,पूजा आडकर यांच्यासह व्यवस्थापनशास्त्राचे विद्यार्थी ,प्राध्यापक उपस्थित होते
डॉ.सचिन वेर्णेकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रम तसेच कारकिर्दीच्या संधींची माहिती दिली .ते म्हणाले , 'आयएमईडी च्या प्लेसमेंट ड्राइव्हला कंपन्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे . विद्यार्थ्यांना आधुनिक जगातील अद्ययावत ज्ञान देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. विद्यार्थ्यांनी या क्षेत्रातील नवी क्षितिजे गाठण्यासाठी मार्गदर्शन घेऊन यशस्वी व्हावे ', भारती विद्यापीठाच्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बार्कलेज कंपनीकडून ट्रेनिंंग मिळाले. विद्यार्थ्याचे एसडब्ल्यूओसी अनॅलिसिस( SWOC analysis ) केले जाणार आहे.
Reviewed by ANN news network
on
७/२१/२०२३ ०३:२०:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: