दिलीप शिंदे
सोयगाव : चिंचोली पिंप्री ता.जामनेर येथील घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सोयगाव तालुका नाभिक समाजाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करून या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निवेदन सोयगाव तहसील कार्यालयात देण्यात आले.
सोयगाव तालुका नाभिक महामंडळाचे अध्यक्ष केदार राऊत यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढण्यात येवून या घटनेचा निषेध नोंदवून चौकशी चे निवेदन तहसीलदार हरणे यांना दिले. जामनेर तालुक्यातील चिंचोली पिंप्री येथे अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली कोणतीही पूर्वसूचना न देता बेचाळीस दुकानांपैकी हेतुपुरस्सर दोन नाभिक समाज बांधवांच्या सलून दुकान मालक जेवण्यासाठी घरी गेलेले असतांना सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी दिलीप चंडावर व जैस्वाल यांच्या आदेशाने जेसीबी लावून खुर्च्या सलून साहित्यासह विहिरीत फेकून दिल्या यामध्ये पूर्णतः भूमिहीन असलेल्या दोन्ही नाभिक बांधवांचे दोन लाखापेक्षा जास्त मालमत्तेचे नुकसान झाले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांना तातडीने मदत मिळून संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी अन्यथा संपूर्ण नाभिक समाज या घटनेविरुद्ध न्याय मिळेपर्यंत आंदोलन करीत राहील असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर नाभिक समाज महामंडळाच्या अध्यक्षांसह नाभिक बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.यावेळी नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Reviewed by ANN news network
on
७/२१/२०२३ ०१:०६:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: