कोकण : डॉक्टरांच्या सन्मानार्थ ९ जुलै रोजी दापोलीत सायकल फेरी

 


दापोली : रात्रंदिवस रुग्णसेवा करणाऱ्या, वेळप्रसंगी आपल्या जीवाची, परिवाराची तमा न बाळगता रुग्णांचा जीव वाचविणाऱ्या, अखंड देशसेवच व्रत हाती घेतलेल्या डॉक्टर बंधू आणि भगिनी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवारी, ९ जुलै २०२३ रोजी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.

ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु होईल. ती केळस्कर नाका, उपजिल्हा रुग्णालय, बाजारपेठ, बुरोंडी नाका, नवभारत छात्रालय, नर्सरी रोड, वडाचा कोंड, लालबाग, उदयनगर अशा ६ किमी मार्गावर असेल. समारोप आझाद मैदानात सकाळी ९:३० वाजता होईल. या सायकल फेरी मार्गावरील काही दवाखाने आणि डॉक्टरांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानण्यात येईल, त्यांच्या सेवाभावाला सलाम करण्यात येईल. सायकल फेरी झाल्यावर आझाद मैदानात सायकल दुरुस्ती, पावसाळ्यात सायकल चालवताना घ्यावयाची काळजी इत्यादीबद्दल माहितीपूर्ण छोटे सेशन होईल.

या सायकल फेरीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. सर्व वयोगटातील सायकल प्रेमी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८७६७२१९६१०, ८७६७६५०५३७ हे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

कोकण : डॉक्टरांच्या सन्मानार्थ ९ जुलै रोजी दापोलीत सायकल फेरी कोकण : डॉक्टरांच्या सन्मानार्थ ९ जुलै रोजी दापोलीत सायकल फेरी Reviewed by ANN news network on ७/०८/२०२३ ११:४१:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Advt.

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".