भाळवणी : भाळवणी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर येथील एका हायस्कूलमधील शिक्षकाने नववीत शिकणा-या एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली असून या प्रकरणी विद्यार्थ्याच्या पालिकांनी पोलिसात धाव घेतली आहे. पोलिसांनी उपचार आणि वैद्यकीय अहवाल मिळण्यासाठी या विद्यार्थ्याला शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.
भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत नववीत शिकणारा श्रीशैल्य सुधीर कदम या विद्यार्थ्याला नरगिडे नामक शिक्षकांनी आज सकाळी शाळेतील वर्ग सुरू असताना मारहाण केली. श्रशैल्य आणि काही मित्र कगदाचे बोळे एकमेकांना फ़ेकून मारत होते. याचा राग आल्याने नरगिडे यांनी श्रीशैल्य याला काठीने बेदम मारहाण केली. त्याच्या पाठ, मांडी आणि पोटरीवर ११ तास उलटून गेले तरी वळ कायम आहेत. या प्रकरणी बोलताना या विद्यार्थ्याचे वडील म्हणाले मारहाण होत असताना माझा मुलगा जीव वाचविण्यासाठी वर्गाबाहेर मुख्याध्यापकांच्या कार्यालयाकडे पळत असताना नरगिडे यांनी त्याला गचांडी धरून परत वर्गात आणले आणि आणखी मारहाण केली. या प्रकरणी त्यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीसठाण्यात धाव घेतली असता पोलिसांनी उपचार आणि वैद्यकीय अहवाल मिळण्यासाठी त्यांच्या मुलाला पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.
या शिक्षकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी. तसेच संस्थाचालकांनी या शिक्षकावर कारवाई अशी मागणी श्रीशैल्य याच्या वडिलांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: