पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्री नागपूर दौरा अर्ध्यात सोडून मुंबईत परत!

 


मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या युतीतील प्रवेशामुळे शिंदेसेनेतील काही नेते पराकोटीचे नाराज झाले असून त्यांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपला नागपूर दौरा अर्ध्यात सोडून मुंबईत परतावे लागले असल्याचे वृत्त आहे. 

आपल्या गटाच्या आमदार, खासदारांची तातडीची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली असल्याचे समजते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या नागपूर आणि गडचिरोलीच्या दौ-यावर असून त्यांचे काल सायंकाळी नागपुरात आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.

राष्ट्रपतींना राजभवनात पोहोचवल्यानंतर मुख्यमंत्री नागपुरात थांबणार होते. मात्र, ते अचानक आपला दौरा रद्द करून तातडीने मुंबईत परतले. त्यांनी तातडीने आपल्या गटाच्या आमदार, खासदारांची बैठक बोलावली आहे.

अजित पवार यांच्या युतीतील प्रवेशामुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. ्ते आपली कोंडी करतील असे शिंदेसेनेच्या काही नेत्यांना वाटत आहे. यातून काही वादविवाद होऊ शकतील असेही या नेत्यांना वाटत आहे. या सर्वांची समजूत काढण्यासाठी शिंदे यांना तातडीने मुंबईत परतावे लागले असल्याचे वृत्त आहे.


पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्री नागपूर दौरा अर्ध्यात सोडून मुंबईत परत! पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्री नागपूर दौरा अर्ध्यात सोडून मुंबईत परत! Reviewed by ANN news network on ७/०५/२०२३ १०:५६:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".