मुंबई
: ११ ऒगस्टनंतर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असा दावा देशातील
काही आघाडीच्या संकेतस्थळांनी केला आहे. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्य विधानसभाध्यक्ष राहुल
नार्वेकर शिंदे आणि त्यांच्या १६ समर्थक आमदारांना अपात्र ठरवतील. त्यानंतर पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील असे रेडीफ़ आणि
फ़र्स्टपोस्ट यांनी म्हटले आहे.
भाजपच्या
केंद्रीय नेतृत्वाने ही व्यूहरचना केली असल्याचा दावाही या बातमीत करण्यात आला
आहे. उपमुख्यमंत्री म्हणून सत्तेत सामील व्हा आणि ऒगस्टपर्यंत प्रतिक्षा करा असे
अजित पवार यांना सांगण्यात आले असून त्यांना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन देण्यात
आले आहे.
एकनाथ
शिंदे यांच्या बंडापूर्वीपासून अजित पवार भाजपच्या संपर्कात होते. परंतु त्यांना
मुख्यमंत्री करण्यास त्यावेळी भाजपच्या
नेतृत्वाने नकार दिल्याने ही योजना फ़सली. अन्यथा शिंदे यांच्या बंडापूर्वीच अजित
पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले असते; असे या बातमीत म्हटले
आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: