अजितदादांना क्लीन चिट नाही; चौकशी चालू आहे : श्रीकांत भारतीय

 


अजित पवारांचा निर्णय हा राज्यातील सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी.....


पिंपरी :अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याबाबत चौकशी चालू आहे. सिंचन घोटाळ्यातून कोणताही क्लीन चीट अजित पवार यांना देण्यात आलेली  नाही अशी माहिती भाजपचे महासचिव व आमदार श्रीकांत भारतीय यांनी  ४ जुलै रोजी पिंपरी येथे दिली. पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापाच्या कार्यक्रमात  ते बोलत होते.

  भाजपने राष्ट्रवादी पक्ष फ़ोडला या आरोपाबद्दल बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले की, मुळात अजित पवार भारतीय जनता पार्टीत आले नाहीत, तर त्यांचा पक्ष सरकारमध्ये सहभागी झाला आहे. अजित पवारांनी राज्यातील सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय हा राज्यातील साडेबारा कोटी जनतेच्या हितासाठीच घेतलेला निर्णय आहे.याआधी शिंदे फडणवीस सरकार स्थापन करण्यामागे सर्वसामान्य माणसाचे हित,हेच ध्येय होते.

 यावेळी पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे,माजी स्वीकृत सदस्य मोरेश्वर शेडगे,राजू दुर्गे,राजेश पिल्ले,क्षितिज गायकवाड आदी उपस्थित होते.

राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले की, घेतलेला निर्णय हा सामान्य माणसाच्या हिताचा असेल तर,तो निर्णय जनता नक्कीच स्वीकारते.अजित पवार राज्यातील सत्तेत सामील होत असताना.सामान्य जनतेच्या हितासाठी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.

नरेंद्र मोदी हेच देशाचे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत,असे दुसऱ्या एखाद्या पक्षाला वाटावे हे खूप महत्त्वाचे ठरते.

२०१४ ते २०१९ च्या सरकारने केलेल्या कामगिरीवर निवडणुकीत जनतेने कौल दिला होता.२०१९ ला सत्तेत आलेले सरकार हे न्याय तत्वाचे सरकार नव्हते,त्यामुळे जनतेच्या मनातील सरकार यावे यासाठी प्रयत्न झाले व तसेच सरकार सत्तेत आले आहे.

 पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने यावेळी चांगली कामगिरी बजावणाऱ्या अधिकाऱ्यांना लोकहितवादी पुरस्कार देऊन आमदार श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते गौरविले. एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस (निरीक्षक) राजेंद्र निकाळजे व पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी व साहित्यिक वि.रा.मिश्रा यांचा यावेळी गौरव करण्यात आला.या कार्यक्रमात बोलताना श्रीकांत भारतीय म्हणाले की,दर महिन्याला असा पुरस्कार पत्रकार संघ देणार हे कौतुकास्पद आहे.पत्रकार संघाचा लोकांच्या चांगुलपणावर विश्वास आहे.हे यातून सिद्ध होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार बाळासाहेब ढसाळ होते.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे,वि.रा.मिश्रा,अतुल परदेशी यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक अरुण उर्फ़ नाना कांबळे यांनी केले,आभार गोविंद वाकडे यांनी मानले,तर सूत्रसंचालन माधुरी कोराड यांनी केले.
अजितदादांना क्लीन चिट नाही; चौकशी चालू आहे : श्रीकांत भारतीय अजितदादांना क्लीन चिट नाही; चौकशी चालू आहे : श्रीकांत भारतीय  Reviewed by ANN news network on ७/०५/२०२३ ०९:४९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".