दरोडा घालण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

 


जगताप डेअरी जवळ सांगवीकडे जाणारे सर्व्हिसरोडचे कडेला अंधारात काही पिंपरी : वाकड पोलिसांनी जगताप डेअरी नजिक दरोडा घालण्याच्या तयारीत थांबलेल्या एका टोळीला जेरबंद केले आहे. त्या टोळीकडून धारदार शस्त्रे आणि मिरचीपूड जप्त करण्यात आली आहे. 

वेंकटेश सुरेश नाईक वय २४ वर्षे रा.राजवाडेनगर, जयहिंदकॉलनी, काळेवाडी, चेतन काकासाहेब वाघमारे वय २३ वर्षे रा. ओंकार कॉलनी, नढेनगर, काळेवाडी,  शेखर काळुराम जांबुरे व १९ वर्षे रा. भारत कॉलनी नढेनगर काळेवाडी यांना  अटक करण्यात आली असून  एका अल्पवयीन टोळीसदस्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर एकजण पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.

जगताप डेअरी जवळ सांगवीकडे जाणारे सर्व्हिसरोडच्या बाजूला अंधारात काहीजण थांबले असल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन त्यांची चौकशी करून अंगझडती घेतली असता त्या टोळीकडे  ०१ तलवार, ०२ धारदार कोयते, मिरचीपूड सापडली.

त्यामुळे आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध  वाकड पोलीसठाण्यात ६६६/२०२३  क्रमांकानेभादंविक ३९९, आर्म अॅक्ट ४,२५, महा.पो.का.क.३७(१)(३)सह १३५ प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला असून वेंकटेश  नाईक हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक गणेश जवादवाड, निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे, सहायक निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक  चव्हाण, शिपाई स्वप्निल लोखंडे, विनायक घारगे, व्हरकटे, कदम,जाधव, होमगार्ड के.सी.घुगे यांनी ्केली.


दरोडा घालण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद दरोडा घालण्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद Reviewed by ANN news network on ७/१७/२०२३ ०४:३६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".