ब्रेकिंग : अजित पवार गट पुन्हा शरद पवारांना भेटणार!

 


मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली. ही बैठक अर्धातास चालली. आज पुन्हा एकदा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंडखोर आमदार शरद पवारांच्या भेटीसाठी गेले आहेत. शरद पवार थोड्याच वेळात यशवंतराव चव्हाण केंद्रात येणार आहेत. यावेळी पवार आमदारांशी संवाद साधणार असून या बैठकीत काय चर्चा होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, काल अजित पवार यांच्यासोबत सरकारमध्ये सहभागी झालेले राष्ट्रवादीचे सर्व मंत्री शरद पवारांना भेटायला गेले होते. दुसरीकडे जयंत पाटील म्हणाले होते की, सर्व बंडखोर मंत्र्यांनी शरद पवारांकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. आजही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्व बंडखोर आमदार यशवंतराव चव्हाण केंद्रात आले आहेत. शरद पवार सिल्व्हर ओकवरून चव्हाण सेंटरला रवाना झाले आहेत. जितेंद्र आव्हाड आणि  जयंत पाटील हेही चव्हाण सेंटरमध्ये पोहोचत आहेत.

दरम्यान, सर्व आमदार आणि मंत्री शरद पवार यांची भेट घेऊन  हा गुंता सोडवण्याची विनंती करणार आहेत. शरद पवार बॅकफूटवर जाणार का? राष्ट्रवादीत पुन्हा समेट होणार का? शरद पवार भाजपसोबत जाणार का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. 

दरम्यान, आजच्या अधिवेशनावरही राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी बहिष्कार टाकल्याचे चित्र होते. यामागचे कारण समोर येणे अपेक्षित आहे.

ब्रेकिंग : अजित पवार गट पुन्हा शरद पवारांना भेटणार! ब्रेकिंग : अजित पवार गट पुन्हा शरद पवारांना भेटणार! Reviewed by ANN news network on ७/१७/२०२३ ०३:२६:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".