टाटा टेक्नोलॉजीजने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी इनोवेन्ट प्लॅटफॉर्म सुरु केला

 



या इनोवेशन स्पर्धेमध्ये भारतातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी प्रोजेक्ट प्रवेशिका मागवण्यात आल्या आहेत. महिला इंजिनीयर्स  दिव्यांग टीम सदस्य उत्पादन क्षेत्रासमोरील वास्तविक समस्यांवर उपाययोजना सुचवणार

                                                                                                            

पुणे : अभियांत्रिकी आणि उत्पादन विकास डिजिटल सेवा क्षेत्रातील जागतिक पातळीवरील कंपनी टाटा टेक्नोलॉजीजने टाटा टेक्नोलॉजीज इनोवेन्ट हा इनोवेशन प्लॅटफॉर्म सुरु केल्याची घोषणा केली आहे.  उत्पादन उद्योगक्षेत्रासमोरील आव्हाने दूर करण्यासाठी शोधून काढलेल्या सर्जनशील व नाविन्यपूर्ण उपाययोजना प्रदर्शित करण्याची संधी भारतातील युवा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना देण्यासाठी हा इनोवेशन प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला आहे.

 

अधिक चांगल्या उत्पादनांच्या कल्पना शोधून काढण्यासाठीडिझाईन तयार करण्यासाठीउत्पादने विकसित करून आणि ती तयार करण्यासाठी उत्पादन कंपन्यांना मदत करणाऱ्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांप्रती आमची बांधिलकी  'इंजिनीयरिंग अ बेटर वर्ल्डया टाटा टेक्नोलॉजीजच्या व्हिजनमधून दर्शवली जाते. जागतिक पातळीवरील एक कंपनी म्हणून आम्ही जगभरातील विविध टीम्सच्या एकत्रित नैपुण्याचा उपयोग करवून घेतोआमच्या ग्राहकांसमोरील गुंतागुंतीची अभियांत्रिकी आव्हाने दूर करण्यासाठी सहयोगात्मक प्रयत्न करतो. इनोवेन्टमार्फत आमच्या इनोवेशन नेटवर्कचा विस्तार करण्याचेअभियंत्यांच्या नवीन पिढीला भविष्यासाठी नाविन्यपूर्ण उपाययोजना शोधून काढण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आमचा उद्देश आहे.

 

इनोवेन्टमध्ये भारतभरातील अभियांत्रिकीच्या तृतीय व चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांना वास्तविक जगातील समस्या दूर करणारे नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्सचे प्रस्ताव सादर करण्यासाठी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. हे प्रोजेक्ट्स विविध क्षेत्रांमधील असू शकतातउदाहरणार्थइलेक्ट्रिक वाहनेस्वयंचलित वाहनेसायबर सुरक्षाडेटा व आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभियांत्रिकीस्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्स. टाटा टेक्नोलॉजीजचे सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट्स (एसएमई) सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या टीम्सना मार्गदर्शन करतील. वैविध्यनावीन्यव्यवहार्यता आणि प्रभाव या निकषांवर प्रोजेक्ट्सचे मूल्यांकन केले जाईल.  महिला इंजिनीयर्स आणि दिव्यांग व्यक्ती यांच्या सहभागावर विशेष भर दिला जाईल. विजेत्या तीन टीम्सना मिळून ४.५ लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल आणि टीम सदस्यांना टाटा टेक्नोलॉजीजमध्ये पेड इंटर्नशिप ऑफर केली जाईल. इनोवेन्ट प्रोग्रामचे अधिक तपशील https://www.tatatechnologies.com/innovent/ वर उपलब्ध आहेत आणि प्रोजेक्ट सबमिशनची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे.

 

टाटा टेक्नोलॉजीज इनोवेन्ट सुरु करण्यात येत असल्याबद्दलटाटा टेक्नोलॉजीजचे एमडी आणि सीईओ श्री वॉरेन हॅरिस यांनी सांगितले"शिक्षणक्षेत्रासोबत समन्वय साधून आणि युवा इनोवेटर्सना नवीन गोष्टी शिकण्यासाठीस्वतःची सर्जनशीलता विकसित करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण उपाययोजना विकसित करण्यासाठी सक्षम बनवून 'इंजिनीयरिंग अ बेटर वर्ल्डसाठीची आमची वचनबद्धता टाटा टेक्नोलॉजीज इनोवेन्टमधून दर्शवली जात आहे असे आम्ही मानतो. या प्रोग्रामचा एक भाग म्हणूनआम्ही उत्पादन उद्योगक्षेत्रासमोरील वास्तविक जगातील आव्हाने शोधून काढली आहेत आणि या प्रोग्राममधून आम्हाला नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट एन्ट्रीज मिळतील ज्यांना आम्ही मार्गदर्शन पुरवू शकू व इन्क्युबेट करू शकू."

 

टाटा टेक्नोलॉजीजचे मार्केटिंग व बिझनेस एक्सेलेन्सचे ईव्हीपी आणि ग्लोबल हेड श्री. संतोष सिंग यांनी सांगितले, "टाटा टेक्नोलॉजीज इनोवेशन दृष्टिकोन हा करू शकतील अशा वृत्तीवर आधारित आहे. हे असे एक मूल्य आहे जे टाटा टेक्नोलॉजीजमध्ये आम्हाला आधीपासूनच्या फ्रेमवर्क्सच्या पलीकडे जाऊननवीन उपाययोजना शोधून काढण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांच्या व्यवसायातील आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रवृत्त करते.  इनोवेन्टमार्फत आम्ही एक प्लॅटफॉर्म प्रदान करू इच्छितो जो भारतातील युवा इंजिनीयर्सना अशा नाविन्यपूर्ण व सर्जनशील उपाययोजना शोधून काढण्यासाठी प्रोत्साहन देईल ज्यामध्ये उत्पादन उद्योगक्षेत्रासमोरील आव्हाने दूर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला असेल. निवडण्यात आलेल्या टीम्सना पाठिंबा व मार्गदर्शन पुरवण्याची आम्ही योजना आहे.  आम्ही अशा टीम्स शोधू इच्छितो ज्यांच्याकडे करू शकतो ही वृत्ती व पुढे वाढवता येईल असे इनोवेशन आहे.  महिला इनोवेटर्स आणि दिव्यांग टीम सदस्यांनी यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशी माझी इच्छा आहे." 

टाटा टेक्नोलॉजीजने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी इनोवेन्ट प्लॅटफॉर्म सुरु केला टाटा टेक्नोलॉजीजने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी इनोवेन्ट प्लॅटफॉर्म सुरु केला Reviewed by ANN news network on ७/१७/२०२३ ०५:२३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".