मराठवाडा : आठवडे बाजारात जाणाऱ्या पायवाटेवर पंचायत समिती इमारतीच्या इमारतीचा राडारोडा, महिलांची तारेवरची कसरत..

 


दिलीप शिंदे 

सोयगाव : पंचायत  समितीची जुनी इमारत पडण्याचे काम सोमवार पासून हाती घेण्यात आले होते. ठेकेदाराकडून पंचायत समितीची इमारत जमीनदोस्त करण्यात आली परंतु इमारतीचा मलबा बाजूला करण्यात आला नसल्याने महिलांसह नागरिकांना ये-जा करण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता. यामुळे महिलांनी नाराजी व्यक्त केली होती.  

    याबाबत सविस्तर माहिती अशी, मंगळवारी सोयगाव येथील आठवडा बाजार हा पंचायत समितीच्या मैदानात भरतो. शहरासह आमखेडा गावातील  सत्तर टक्के नागरिकांचा ये-जा करण्यासाठी तीस-पस्तीस वर्षांपासून  अमृतेश्वर शिक्षक पतसंस्थेच्या आवारातून पंचायत समितीला लागून  पायवाट आहे. सोमवारी ठेकेदाराकडून पंचायत समितीची इमारत पाडण्याचे काम हाती घेतले  होते. इमारत पडल्यानंतर इमारतीचा मलबा हा पायवाटेवर पडलेला होता. ठेकेदाराने पायवाट कडील मलबा बाजूला न हटविल्यामुळे बाजारासाठी जाणाऱ्या-येणाऱ्या महिलांना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागली होती. या होणाऱ्या त्रासाबद्दल महिलांनी नाराजी व्यक्त केली होती.ठेकेदाराने तात्काळ पायवाटेतून मलबा हटवावा अशी मागणी महिलांकडून होत आहे.

मराठवाडा : आठवडे बाजारात जाणाऱ्या पायवाटेवर पंचायत समिती इमारतीच्या इमारतीचा राडारोडा, महिलांची तारेवरची कसरत.. मराठवाडा : आठवडे बाजारात जाणाऱ्या पायवाटेवर पंचायत समिती इमारतीच्या इमारतीचा राडारोडा, महिलांची तारेवरची कसरत..  Reviewed by ANN news network on ७/०४/२०२३ ०८:२०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".