मराठवाडा : डेमो हाऊसवर कोसळलेले झाड दोन महिन्यांपासून पडून, गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष..

 


दिलीप शिंदे

सोयगाव :  जिल्हा ग्रामीण विकास योजना औरंगाबाद यांनी प्रधानमंत्री आवास योजना, महा आवास अभियान ग्रामीण अंतर्गत लाख दीड लाख रुपये खर्च करून पंचायत समिती कार्यालयाजवळ डेमो हाऊस बांधले आहे.गेल्या दोन महिन्यांपूर्वी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती यात सोयगाव शहरासह तालुक्यात घरांची पडझड व मोठमोठी वृक्ष जमीनदोस्त होऊन फार मोठे नुकसान झाले होते. याच वादळी वाऱ्यात या डेमो हाऊसवर झाड कोसळले होते.


पंचायत समिती कार्यालयाच्या बाजूलाच डेमो हाऊस बांधण्यात आले आहे. गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे कर्मचारी यांची  जातायेता वक्रदृष्टी डेमो हाऊस कडे पडत होती मात्र कर्मचारी व  गटविकास अधिकारी यांनी याची कोणतीही दखल घेतलेली नाही. गेली दोन महिने झाले अजूनही पंचायत समिती कार्यालयाने डेमो हाऊस वरील झाड बाजूला केले नसल्याने शासनाच्या मालमत्तेचा वाली कोण असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

गटविकास अधिकारी यांचा अंकुश कर्मचाऱ्यांवर राहिला नसल्याने शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे. याकडे जिल्हा ग्रामीण विकास योजना औरंगाबाद येथील अधिकारी काय कारवाई करतात की सोयगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांनी पाठीशी घालतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

मराठवाडा : डेमो हाऊसवर कोसळलेले झाड दोन महिन्यांपासून पडून, गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष.. मराठवाडा : डेमो हाऊसवर कोसळलेले झाड दोन महिन्यांपासून पडून, गटविकास अधिकाऱ्याचे दुर्लक्ष.. Reviewed by ANN news network on ७/०४/२०२३ ०८:१७:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".