पिडीलाइटच्या रॉफ या अत्याधुनिक टाइल फिक्सिंग अधेसिव्ह ब्रँडतर्फे ग्राहकांसाठी नवे कॅम्पेन

 

 


या कॅम्पेनमधून टाइल बसवण्याच्या जुन्या पद्धतींऐवजी रॉफची जास्त चांगली वैशिष्ट्ये समजावून दिली जाणार


 

मुंबई :  पिडीलाइट या बांधकाम आणि स्पेशॅलिटी रसायने क्षेत्रातील आघाडीच्या उत्पादक कंपनीने नवे कॅम्पेन लाँच केले असून त्याअंतर्गत टाइल बसवण्यासाठी वापरल्य जाणाऱ्या पारंपरिक पद्धतींचे काय परिणाम होतात याविषयी जागरूकता निर्माण केली जाणार आहे. या कॅम्पेनमध्ये टाइल्सना तडा जाणं, त्या विलग होणं, पडणं, टाइल बसवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमेंटसह विविध घटकांमुळे एकंदरीत सौंदर्य नष्ट होणं यातून ग्राहकाला येणारा वैताग दाखवला जाणार आहे.

गेल्या काही दशकांत टाइल्सच्या वापरात लक्षणीय बदल झाला आहे आणि टाइल बसवण्याच्या पारंपरिक पद्धती नव्या युगातील ग्राहकांच्या बदलत्या ग्राहकांशी सुसंगत राहिल्या नाहीत.

सिरॅमिक टाइल्सचा पृष्ठभाग मातीचा असल्यामुळे त्या सिमेंटच्या मदतीने चांगल्या प्रकारे बसवता येतात, मात्र आजकाल प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या व्हिट्रीफाइट टाइल्सचा पृष्ठभाग गुळगुळीत असल्यामुळे फक्त सिमेंटनं बसवता येत नाही. शिवाय, टाइल्सचा आकारही मोठा झाला आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये टाइल्स बसवतानाचा घट्टपणा तुलनेनं कमी अतो. आधुनिक पद्धतीच्या टाइल्स व दडग बसवताना जास्त चांगले गुणधर्म असलेले आणि सर्वत्र एकसमान पसरणारे अधेसिव्ह आवश्यक असते.

त्याशिवाय फिक्सिंगसाठी लागणाऱ्या इतर घटकांमध्ये पाण्याचा वापर केला जातो, ज्याचं वेगानं बाष्पीभवन होतं. पर्यायानं हवामान बदलांमुळे टाइल्स लवकर तुटतात. मात्र, रॉफ अधेसिव्हसाठी पाण्याची गरज नसते आणि त्यावर बदलत्या हवामानाचा परिणाम होत नाही.

ही आव्हाने लक्षात घेत कंपनीने ग्राहकांना विचारपूर्वक निर्णय घेण्यास मदत व्हावी म्हणून कॅम्पेन लाँच केले आहे. टाइल्स  बसवताना येणाऱ्या सर्वसामान्य अडचणी कमी करण्यासाठी रॉफ टाइल अधेसिव्ह खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे. रॉफ टाइल अधेसिव्ह जास्त मजबूतपणे चिकटते. त्यामुळे फिक्सिंग चांगले होते व टाइल्सची पातळी एकसमान राखता येते.

या नव्या कॅम्पेनविषयी पिडीलाइट इंडस्ट्रीजचे उप व्यवस्थापकीय संचालक सुधांशू वत्स म्हणाले, उद्योन्मुख उत्पादन विभागात अग्रणी राहाणे हे पिडीलाइटचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. आमच्या रॉफ या ब्रँडने भारतातील टाइल बसवण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. त्याविषयी आणखी जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही राष्ट्रीय पातळीवर कॅम्पेन आखले असून त्यातून ग्राहकांचा अनुभव उंचावण्यास मदत होईल. रॉफ उत्पादने अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक तज्ज्ञांचे योगदान आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन बनवली जातात. या उत्पादनांमुळे कंत्राटदार, आर्किटेक्ट्सना दीर्घकाळ टिकणारे टाइल व दगडांचे आकर्षक डिझाइन निःशंकपणे तयार करता येते. या उपक्रमाया माध्यमातून ग्राहकांना योग्य माहिती देत सक्षम करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दीर्घकाळ टिकणारे फॉर्म्युलेशन यामुळे रॉफ पर्यावरणपूरक अधेसिव्ह उत्पादनांत आघाडीवर आहे. हे कॅम्पेन ब्रँडची दर्जा, कामगिरी, शाश्वतता कायम राखण्याच्या विचारसरणीला अनुसरून आहे. त्याशिवाय ग्राहकांना दर्जेदार कामगिरीसह पर्यावरणाची कमी हानी करणारी उत्पादने पुरवण्याची ब्रँडची बांधिलकीही यातून जपली गेली आहे.

पिडीलाइटच्या रॉफ या अत्याधुनिक टाइल फिक्सिंग अधेसिव्ह ब्रँडतर्फे ग्राहकांसाठी नवे कॅम्पेन पिडीलाइटच्या रॉफ या अत्याधुनिक टाइल फिक्सिंग अधेसिव्ह ब्रँडतर्फे ग्राहकांसाठी नवे कॅम्पेन Reviewed by ANN news network on ७/१२/२०२३ १०:०३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".