मुंबई :निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लगबग सुरू केली आहे. या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातहोण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका राजपत्रात असे म्ह्टले आहे की;स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका यासाठी मतदार याद्या अंतिम करण्यासाठी अधिसूचना काढण्यात येईल, .त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोरोनामुळे, ओबीसी आरक्षण आणि राज्यातील सत्तांतरामुळे रखडल्या होत्या. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ?
Reviewed by ANN news network
on
७/०७/२०२३ ०२:१०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: