मुंबई : मी नेहमीच पक्षाचा आदेश पाळला आहे, मी पक्षाच्या विरोधात जात नाही, मग माझ्या नैतिकतेवर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत? अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या चर्चेला त्यांनी पत्रकार परिषदेतून पूर्णविराम दिला. मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. मी भाजपमध्येच राहणार आहे. मी राहुल आणि सोनिया गांधी यांना भेटले नाही. माध्यमांनी खोट्या बातम्या दाखवल्या. मला तिकीट मिळालं नाही तरीही मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मी पक्षाच्या विरोधात जात नाही असेही त्या म्हणाल्या.
मी भाजपमध्येच आहे; आणि राहणार! : पंकजा मुंडे
Reviewed by ANN news network
on
७/०७/२०२३ ०२:५९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: