मुंबई : विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोर्हे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला आहे. त्यांनी आज शिवसेना ठाकरे गटातून एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा सोहळा मुंबईत पार पडला.
यावेळी त्या म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यामुळे देशाचा विकास झाला आहे. महिलांचे प्रश्न आणि देशाचा विकास हेच मुख्य उद्दिष्ट ठेवून मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या गोटात सुषमा अंधारे यांचे महत्त्व वाढले आहे की नाही? या प्रश्नावर त्यांनी बोलण्यास नकार दिला.आपली भूमिका विकासाची असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास होत आहे. त्यामुळेच आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना आणि भाजपचा विचार एकच आहे. त्यामुळे मी नीलम गोर्हे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहिलो असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: