मोटारसायकलचोर टोळी अटकेत; १४ मोटारसायकली जप्त

 


पिंपरी : पिंपरी पोलिसांनी एका मोटारसायकल चोरांच्या टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली असून त्यांची किंमत ६ लाख ६० हजार इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

दादासाहेब ऊर्फ दादया प्रकाश पटेकर वय १९ वर्ष, रा.मु.आडगांव, पोस्ट- निरी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर,  योसेफ शमुवेल खंडागळे वय-२२ वर्ष, रा. गणेश नगर कॉलनी नं. ५ शुभम अपार्टमेंट, सुदामा जीम समोर बोपखेल पुणे, आकाश प्रकाश पटेकर वय - २३ वर्ष, रा.मु. आडगांव, पोस्ट-निरी, ता.पाथर्डी, जि.अहमदनगर अदित्य अनिल देशमुख वय - २३ वर्ष, रा. चुरमापुरी, ता. आंबड, जि. जालना, सुनिल ऊर्फ गोटया सुरेश वाळेकर वय - २५ वर्ष, रा.मु. पिंपळगांव, पो. दौलावडगांव, ता. आष्टी, जि. बीड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 

त्यांच्यावर पिंपरी पोलीसठाण्यामध्ये ६३२ / २०२३ क्रमांकाने भादंवि कलम ३७९ खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी पोलिसांचे पथक २७ जून रोजी दुपारी ३ वाजून २० मिनिटांच्या सुमारास केसएसबी चौकाकडून पिंपरी मोरवाडी कोर्टाकडे जाणाऱ्या रस्त्यावर तपासणी करत असता त्यांना नंबरप्लेट नसलेल्या दोन  मोटारसायकलीवरून  जाणारे तिघेजण दिसले, पोलिसांनी थांबण्याचा इशारा करूनही ते थांबले नाहीत. त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना ताब्यात घेतले. मोटारसायकलीच्या नंबरप्लेटविषयी पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करून नोंदणीची कागदपत्रे मागितली तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. त्यामुळे त्यांना पोलीसठाण्यात आणून पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यावेळी दादया  पटेकर याने त्याचा मित्र योसेफ खंडागळे याच्या मदतीने या मोटारसायकली चोरल्या असल्याची कबुली दिली.  आणि अदित्य देशमुख व सुनिल वाळेकर यांनी त्या  मोटारसायकली विकत घेतल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

ही कामगिरी उपनिरीक्षक शाकीर जिनेडी, सहायक उपनिरीक्षक भांडवलकर, हवालदार हांडे, बेंदरकर, बारशिंगे, नाईक करपे, महाडिक, बागसिराज, मुजावर, बंड, शिपाई  शेख, जानराव,  ढोकले,  वाघमारे, ढवळे, बजबळकर यांनी केलीे.

मोटारसायकलचोर टोळी अटकेत; १४ मोटारसायकली जप्त मोटारसायकलचोर टोळी अटकेत; १४ मोटारसायकली जप्त Reviewed by ANN news network on ७/०२/२०२३ ०१:०८:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".