मोक्कासह गंभीर गुन्ह्यांमध्ये ’वॉन्टेड’ आरोपीच्या मुसक्या आवळल्या!

 


पिंपरी : मागील दोन वर्षांपासून फ़रार असलेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पिंपरी पोलिसांना यश आले आहे,  मोक्का आणि इतर दोन गंभीर गुन्हे या आरोपीवर दाखल आहेत. 

अमित भुरेलाल सौदे, वय २५ वर्षे, रा. आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी, पुणे  असे या आरोपीचे नाव आहे.

 हा आरोपी पिंपरी पोलीस ठाणे कडील गुन्हा रजि. क्रं. १ ) ८१४/२०२१, भा.दं.वि. कलम ३९७, ३४१, ५०४, ५०६, क्रिमीनल लॉ अॅमेनमेंट अॅक्ट ३, ७ व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ चे कलम ३ (१)(ii). ३ (४), २) ६८० / २०२१ भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ४५२, ४२७, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट ४ (२५), महापोका ३७ (१)(३) सह १३५, क्रि.लॉ. अॅ.ॲ. ३, ७ ३) ३७०/२०२१ भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ३४ या गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता. गेली दोन वर्षे तोन पोलिसांना सतत गुंगारा देत होता.

आरोपी अमित सौदे हा त्याच्या घरी येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक अनिरुध्द सावर्डे यांना मिळाली. त्यांनी ही माहिती  वरिष्ठ पोलीस निरीक्षक  राम राजमाने यांना कळविली. त्यानंतर पोलिसांनी २७ जून रोजी सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान त्याला घराजवळून अटक केली.

ही कारवाई  उपनिरीक्षक अनिरूध्द सावर्डे, शाकिर जिनेडी, हवालदार राजेंद्र बारशिंगे, शांताराम हांडे, नाईक जावेद बागसिराज, गणेश करपे, सोमेश्वर महाडीक, ओंकार बंड, शिपाई  समीर ढवळे व दत्ताजी कवठेकर यांनी केली.

मोक्कासह गंभीर गुन्ह्यांमध्ये ’वॉन्टेड’ आरोपीच्या मुसक्या आवळल्या! मोक्कासह गंभीर गुन्ह्यांमध्ये ’वॉन्टेड’ आरोपीच्या मुसक्या आवळल्या! Reviewed by ANN news network on ७/०२/२०२३ ११:५९:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".