मुंबई : राज्याच्या राजकारणात मोठी घडमोड घडण्याची शक्यता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राजभवनाकडे रवाना. उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राजभवनाकडे रवाना अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ४० आमदारांचे पत्र......
अपडेट
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपच्या युतीत सामील झाली आहेे. अजित पवार शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात असून राष्ट्रवादीचे नऊ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे समजते. राजभवनामध्ये शपथविधीची तयारी सुरू आहे. राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ३० आमदारांचा सरकारला पाठिंबा असल्याचे कळते.
अजित पवार राजभवनावर दाखल झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनाकडे निघाले आहेत. सोबत उदय सामंत, दीपक केसरकर, शंभूराज देसाई आहेत. काही वेळात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून, त्यात उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ आणि इतर आमदारही मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, नीलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील अतुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे आदी उपस्थित होतेअशी माहिती आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, महाराष्ट्र सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सामील झाले. ते भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पोस्ट शेअर करणार आहेत.
अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या एकूण नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला.
आदल्या दिवशी अजित पवार यांनी मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षाचे काही नेते आणि आमदारांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना या बैठकीची माहिती नव्हती.
"ही बैठक नेमकी कशासाठी बोलावली आहे हे मला माहीत नाही, पण विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना अजित पवार आमदारांची बैठक बोलावण्याचा अधिकार आहे. ते ते नियमितपणे करतात. माझ्याकडे याबाबत फारशी माहिती नाही." असे शरद पवार म्हणाले.
अजित पवार यांच्या 'देवगिरी' या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे आदी नेते उपस्थित होते, तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित नव्हते.
अपडेट
अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या या नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
अजित अनंतराव पवार - उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ - मंत्री
दिलीप वळसे पाटील - मंत्री
हसन मुश्रिफ - मंत्री
धनंजय मुंडे - मंत्री
धर्मरावबाबा आत्राम - मंत्री
आदिती तटकरे - मंत्री
संजय बनसोडे - मंत्री
अनिल पाटील - मंत्री
अजित अनंतराव पवार - उपमुख्यमंत्री
छगन भुजबळ - मंत्री
दिलीप वळसे पाटील - मंत्री
हसन मुश्रिफ - मंत्री
धनंजय मुंडे - मंत्री
धर्मरावबाबा आत्राम - मंत्री
आदिती तटकरे - मंत्री
संजय बनसोडे - मंत्री
अनिल पाटील - मंत्री
मोठी बातमी : अजित पवार राजभवनाकडे रवाना ( बातमी अपडेट केली आहे.)
Reviewed by ANN news network
on
७/०२/२०२३ ०१:४५:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
७/०२/२०२३ ०१:४५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: