पिंपरी : अमरावती पोलीसदलात सहायक पोलीस आयुक्त म्हणून काम करणा-या भरत गायकवाड यांनी आज २४ जुलै रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आपली पत्नी आणि पुतण्या यांच्यावर गोळी झाडून त्यांचा खून करत स्वत:वरही गोळी झाडून घेत आत्महत्या केली. पुण्यातील बाणेर परिसरात हा प्रकार घडला.
मोनी गायकवाड (वय ४४), दीपक गायकवाड (वय ३५) अशी खून केलेल्या दोघांची नावे आहेत. भरत गायकवाड अमरावती येथे नोकरीस होते. परंतु त्यांचे कुटुंब पुण्यात रहात होते. पहाटेच्या सुमारास गायकवाड यांनी पत्नीवर गोळी झाडून तिला ठार मारले. गोळीचा आवाज होताच त्यांचा पुतण्या आणि मुलगा सुहास गायकवाड त्यांच्या खोलीत गेले. त्यावेळी त्यांनी पुतण्यावर गोळी झाडून ठार मारले आणि मुलाला निघून जाण्यास सांगितले.त्यानंतर स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली.
त्यांच्या मुलाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली आहे. गायकवाड यांची बदली होत नसल्याने ते तणावात होते. त्यामुळे त्यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले अशी चर्चा आहे. मात्र, याला पुष्टी मिळालेली नाही. हत्येचे कारण पोलीसतपासात पुढे येण्याची शक्यता आहे.
Reviewed by ANN news network
on
७/२४/२०२३ १०:४८:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: