पुणे : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर काल २३ जुलै रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे वाहतूक खोळंबली. ही दरड साडेचार तासांच्या प्रयत्नानंतर हटविण्यात आली असून त्यानंतर दोन लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, लेन अद्याप बंद आहे. त्यामुळे आज २४ जुलै रोजी दुपारी १२ ते दोन या काळात या मार्गावर वाहतूक थांबविण्यात येणार असून आवश्यक ती डागडुजीची कामे केली जाणार आहेत.
या काळात मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक जुन्या महामार्गावर वळवण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे जाताना चिवळे पॉइंट येथून जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वाहतूक वळविण्यात येईल. याच मार्गावरुन चार चाकी, हलकी, मध्यम, अवजड स्वरुपाची वाहने जातील. १२ ते २ यादरम्यान ही वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळविण्यात येईल. दरडी हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकडे जाणारी लेन पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसीने दिली आहे.
Reviewed by ANN news network
on
७/२४/२०२३ ११:२१:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: