उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा

 



राज्यात ठिकठिकाणी भाजपाचे सेवा कार्य

 

मुंबई  : रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त राज्यात  रक्तदान शिबीरआरोग्य शिबीरनेत्रदान शिबीरकृत्रिम अवयवांचे वाटपपूरग्रस्त कुटुंबांना धान्य वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

नागपूर येथे आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूर शहर अध्यक्ष  जितेंद्र कुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे  १५ हजार  नागरिकांना सरकारी खात्यांकडे प्रलंबित असलेली विविध शासकीय कागदपत्रे  देण्यात आली.

मुंबईत धारावीतील गणेश विद्यामंदिर येथे राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढाआ. प्रवीण दरेकरज्येष्ठ पत्रकार किरण शेलारभाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्या प्रमुख उपस्थितीत गरीब कुटुंब आणि सफाई कामगार यांना धान्य वाटप करण्यात आले. कांदिवली ( पश्चिम ) येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान करणाऱ्यांना खा. गोपाळ शेट्टीबाळा तावडेकमलेश यादव, प्रतिभा गिरकर यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रे देण्यात आली.

 लातूर येथे भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या हस्ते स्वच्छता कार्य करणा-या भगिनींचा सत्कार आणि रेनकोट वितरण करण्यात आले. आमदार रमेशअप्पा कराडशहर जिल्हाध्यक्ष  देविदास काळेग्रामीण अध्यक्ष दिलीपराव देशमुखप्रदेश प्रवक्ते  गणेश हाकेप्रेरणा होनराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

ठाणे येथे आमदार निरंजन डावखरे यांच्यातर्फे वाल्मिकी बांधवांना आणि महिला रिक्षाचालक भगिनींना रेनकोट व धान्य वाटप करण्यात आले. माजी राज्यसभा सदस्य डॉ.विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर,  जिल्हाध्यक्ष संजय वाघुलेनम्रता कोळी,  सरचिटणीस विलास साठेराजू सावंत उपस्थित होते.  डहाणू येथे ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंह यांच्या उपस्थितीत महिलांना शिलाई मशीन आणि अन्न धान्याचे वाटप करण्यात आले.    

कणकवली येथे  आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी पोलीस ठाण्यात सर्व पोलिस कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप केले. बार्शीटाकळी ( जि. अकोला ) येथे  पूरग्रस्त गरजू परिवारांना आमदार हरिषभाऊ पिंपळे यांच्या तर्फे धान्य व आवश्यक सामुग्री किट चे वाटप करण्यात आले.

भाजपा  वैद्यकीय आघाडी तर्फे  परतुर ( जि. परभणी )  येथील निवासी मूकबधिर विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून औषधी व पौष्टिक गोष्टींचे वाटप केले गेले . ज्यांना विविध प्रकारचे विकार आहेत त्यांच्या पुढील तपासणीसाठी नोंदणी करण्यात आली .  डॉ स्वप्नील मंत्रीडॉ सुप्रिया मंत्रीडॉ संजय पुरीडॉ सुधीर आंबेकरडॉ हरिप्रसाद ढेरे आदी यावेळी उपस्थित होते.

भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात दिव्यांग सहाय्यता अभियाना चे आयोजन केले होते. या अभियानाच्या माध्यमातून २ हजार दिव्यांगांना सुसह्य उपकरणेकृत्रिम अवयव नोंदणी आणि मोजमाप तसेच रोजगार नोंदणी शिबिर घेण्यात आले. नूमविअहिल्यादेवी हायस्कूलवसंतदादा विद्यालय रेणूका स्वरूपगोळवलकर विद्यालयगोपाळ हायस्कूलज्ञानसाधना विद्यामंदिर  यांसारख्या विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे,  हेमंत रासनेप्रमोद कोंढरेहरिदास चरवड  यावेळी उपस्थित होते .

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस  ‘सेवा दिन’ म्हणून साजरा Reviewed by ANN news network on ७/२३/२०२३ १२:०५:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".