मुंबई : काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. कायंदे यांच्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनी ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश केला.
आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरे गटाकडून नीलम गोर्हे आणि मनीषा कायंदे यांना अपात्र ठरवण्याची जोरदार मागणी करण्यात आली. यामुळे दोघीही अडचणीत आल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाने विधानभवन सचिवांना पत्र पाठवून नीलम गोर्हे आणि मनीषा कायंदे यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. आता गोर्हे आणि कायंदे यांना येत्या चौदा दिवसांत या पत्राचे उत्तर द्यायचे आहे.
दरम्यान, पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक झाल्याने अधिवेशन अर्ध्या तासानंतर तहकूब करावे लागले. काँग्रेस आणि ठाकरे गटाने विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार सहभागी न झाल्याने चर्चेला उधाण आले.
Reviewed by ANN news network
on
७/१७/२०२३ ०२:५१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: