पुणे : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. नीलम गोर्हे यांच्यासह ठाकरे गटाचे आणखी दोन ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्तेही आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या घडामोडीने ठाकरे गटातील अस्थिरता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
आज सकाळपासून नीलम गोर्हे या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरल्या आहेत. मात्र, त्यांच्या नावाची थेट चर्चा झाली नाही. त्यांचा मोबाईल फोनही रिचेबल नाही. त्यामुळे अखेरीस नीलम गोर्हे शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नीलम गोर्हे या केवळ विधानपरिषदेच्या आमदार नाहीत, तर उपसभापतीही आहेत. 22 फेब्रुवारी 1998 रोजी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून त्या शिवसेनेच्या शिस्तप्रिय, निष्ठावान आणि समर्पित सदस्य आहेत. गोर्हे यांनी उपेक्षित व अत्याचारित महिलांसाठी काम केले आहे. शिवसेनेच्या निष्ठावंत सदस्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानपरिषदेच्या उपसभापती म्हणूनही त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले. असे असतानाही त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: