मुंबई : नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून सातत्याने अपघात होत आहेत. बुलढाणा, सिंदखेडराजा, नाशिक, जालना दरम्यानच्या समृद्ध महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वी सिंदखेडराजाजवळ झालेल्या भीषण अपघातात २६ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. आजही समृद्धी महामार्गावर बसचा मोठा अपघात झाला. अपघातांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारने अपघात रोखण्यासाठी ठोस योजना सुरू करण्याचा ठोस निर्णय घेतला आहे.
या महामार्गावर लवकरच एअर अॅम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा निर्णयसरकारकडून घेण्यात आला आहे. अपघाताच्या ठिकाणी तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. याच उद्देशाने राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
समृद्धी महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना एअर अॅम्ब्युलन्स सेवेद्वारे तातडीने मदत मिळेल. सरकारने काही हेलिकॉप्टर कंपन्यांशी चर्चा सुरू केल्याची माहिती आहे. हेलिकॉप्टर कंपनीसोबत करार झाल्यानंतर समृद्धी महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले जाईल. राज्यातील काही महत्त्वाच्या आणि नामांकित रुग्णालयांशी राज्य सरकारकडून करार करण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: