पिंपरी : महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना बढती देण्यात आली असून अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा पदभार डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
महापालिकेचे रिक्त असलेले आरोग्य वैद्यकीय अधिकारी रिक्त पद भरण्यासाठी १९ मे २०२३ रोजी पदोन्नती समितीची बैठक झाली. सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना बढती देण्याची शिफारस समितीने केली.
महापालिका आस्थापनेवरील अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी हे पद रिक्त आहे. त्याचा पदभार ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी काढले आहेत.
पिंपरी : पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. लक्ष्मण गोफणे
Reviewed by ANN news network
on
६/०३/२०२३ १२:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: