पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. परंतु अजूनही अनेक अभ्यासक्रमांचे निकाल लागले नाहीत. एक किंवा दोन दिवस अगोदर विद्यार्थ्यांना निकालाची कल्पना दिली जात आहे. निकाल वेळेत न लागल्याने विद्यार्थ्यांना नाहक संबंधित विषयाचा अभ्यास करावा लागत आहे. तसेच परीक्षा अर्ज भरायला लावून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट विद्यापीठाने चालवली आहे. विद्यार्थ्यांचा आर्थिक व मानसिक छळ विद्यापीठ करत आहे असा आरोप करत युवक क्रांती दलाने फ़ेरतपासणीचे निकाल तात्काळ लावा अन्यथा परीक्षा पुढे ढकला अशी मागणी केली आहे.
याबाबत विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पुरेसे प्राध्यापक व कर्मचारी नसल्याने फ़ेरतपासणीचेच्या निकालास उशीर होत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु या विद्यापीठाच्या अडचणींचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. फ़ेरतपासणीचेचे निकाल लवकरात लवकर लावा अन्यथा परीक्षा पुढे ढकला. अशी युवक क्रांती दलाची भूमिका आहे. याबाबत तातडीने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे. याबाबत युवक क्रांती दलाने परीक्षा विभागाचे संचालक डॉ. महेश काकडे यांच्यासोबत चर्चा करून त्यांनाही निवेदन देण्यात आले.
यावेळी युवक क्रांती दल पुणे शहर अध्यक्ष सचिन पांडुळे, अजय नेमाणे, विद्यार्थी प्रतिनिधी संदीप बुधराणी, पूजा प्रकाश, धम्मदीप भालेराव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: